संग्रहित छायाचित्र
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्ट रोजी कोसळला. त्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण तापलं. पुतळा कोसळला त्या दिवसापासून पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे फरार होता. 4 सप्टेंबरला आपली पत्नी आणि आईला भेटायला आला असताना पोलिसांनी त्याला अटक केली. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबई येथे माध्यमांशी बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मालवण येथे झालेल्या घटनेप्रकरणी सरकार कोणालाही सोडणार नाही. दोषींना कठोर शिक्षा होईल. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. झालेली घटना दुर्दैवी आहे. परंतु या घटनेवर राजकारण करणे त्याहून दुर्दैवी आहे. जयदीप आपटे असो किंवा इतर कुणीही असो त्याला पकडू असे आपण म्हटले होते. आता त्याला पकडण्यात आले होते. कुणीही कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही, असे शिंदे म्हणाले.
कुणीही कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही याच्या अटकेनंतर विरोधकांना चांगलीच चपराक मिळाली आहे. आपटेची चौकशी होऊन त्याच्यावर कारवाई होईल. ही घटना दुर्दैवी होती. मात्र विरोधकांनी त्याच्यावर राजकारण केले. सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य पुतळा लवकरात लवकर तिथे उभारेल हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.