त्रिवार नमो ! नरेंद्र मोदी यांनी घेतली तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ

नवी दिल्ली: भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील एनडीएच्या अनेक खासदारांनी  मंत्रिपदाची शपथ घेतली. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 10 Jun 2024
  • 11:06 am

संग्रहित छायाचित्र

सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे दुसरे पंतप्रधान

नवी दिल्ली: भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील एनडीएच्या अनेक खासदारांनी  मंत्रिपदाची शपथ घेतली. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृ्त्वात एनडीएचे हे सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन झाले आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत राष्ट्रपती भवन परिसरात नरेंद्र मोदी यांचा शपथविधीचा शाही सोहळा पार पडला. या सोहळ्याला देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. तसेच परदेशातील मंत्रीही या सोहळ्याला उपस्थित राहिलेले बघायला मिळाले.

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९५२, १९५७ आणि १९६२ अशा तीन निवडणुकांमध्ये बहुमत गाठून सलग तीनदा पंतप्रधानपद भुषविले होते. त्यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे दुसरे व्यक्ती ठरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर राजनाथ सिंग यांनी शपथ घेतली. तर त्यापाठोपाठ मोदींचे जवळचे सहकारी अमित शाह यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.

महाराष्ट्रातील ६ खासदारांना केंद्रीय कॅबिनेटमध्ये संधी
नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्ममधील कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातील खासदारांनादेखील संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. तसेच उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले खासदार पीयूष गोयल यांनीदेखील मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. याशिवाय खासदार प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, रामदास आठवले यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.

नव्या मंत्रिमंडळातील मंत्र्याची नावे
गुजरात –
१.    अमित शाह
२.    एस. जयशंकर
३.    मनसुख मंडाविया
४.    सी.आर. पाटील
५.    नीमू बेन बंभनिया

हिमाचल –
१.    जे.पी. नड्डा

ओडिशा –
१.    अश्विनी वैष्णव
२.    धर्मेंद्र प्रधान
३.    जुअल ओरम

कर्नाटक –
१.    निर्मला सीतारमण
२.    एचडीके
३.    प्रल्हाद जोशी
४.    शोभा करंदलाजे
५.    व्ही. सोमन्ना    

महाराष्ट्र
१.    पीयूष गोयल
२.    नितिन गडकरी
३.    प्रतापराव जाधव
४.    रक्षा खडसे
५.    रामदास आठवले
६.    मुरलीधर मोहोळ

गोवा –
१.    श्रीपाद नाईक

जम्मू-कश्मीर –
१.    जितेंद्र सिंह

मध्य प्रदेश –
१.    शिवराज सिंह चौहान
२.    ज्योतिरादित्य सिंधिया
३.    सावित्री ठाकुर
४.    वीरेंद्र कुमार

उत्तर प्रदेश –
१.    हरदीप सिंह पुरी
२.    राजनाथ सिंह
३.    जयंत चौधरी
४.    जितिन प्रसाद
५.    पंकज चौधरी
६.    बी. एल. वर्मा
७.    अनुप्रिया पटेल
८.    कमलेश पासवान
९.    एस.पी. सिंह बघेल

बिहार –
१.    चिराग पासवान
२.    गिरिराज सिंह
३.    जीतन राम मांझी
४.    रामनाथ ठाकुर
५.    ललन सिंह
६.    निर्यानंद राय
७.    राज भूषण
८.    सतीश दुबे

अरुणाचल प्रदेश –
१.    किरन रिजिजू

राजस्थान -
१.    गजेंद्र सिंह शेखावत
२.    अर्जुन राम मेघवाल
३.    भूपेंद्र यादव
४.    भागीरथ चौधरी

हरियाणा -
१.    एम.ए. खट्टर
२.    राव इंद्रजीत सिंह
३.    कृष्ण पाल गुर्जर

केरळ
१.    सुरेश गोपी
२.    जॉर्ज कुरियन

तेलंगणा
१.    जी. किशन रेड्डी
२.    बंडी संजय

तमिलनाडू- 
१.    एल. मुरुगन

झारखंड
१.    संजय सेठ
२    अन्नपूर्णा देवी

छत्तीसगढ
१.    तोखन साहू

आंध्र प्रदेश
१.    डॉ.चंद्रशेखर पेम्मासानी
२.    राम मोहन नायडू किंजरापु
३.    श्रीनिवास वर्मा

पश्चिम बंगाल
१.    शांतनु ठाकुर
२.    सुकांत मजूमदार

पंजाब –
१.    रवनीत सिंह बिट्टू

आसाम –
१.    सर्बानंद सोनोवाल
२.    पबित्रा मार्गेह्रिता

उत्तराखंड
१.    अजय टम्टा

दिल्ली
१.    हर्ष मल्होत्रा

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest