अजित पवार गटाविनाच पार पडला मोदींचा शपथविधी समारंभ, ‘कॅबिनेट’च्या आग्रहामुळे हुकली प्रफुल्ल पटेलांची संधी

देशात सलग तिसऱ्यांदा सत्तेचा सोपान राखण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यशस्वी झाले आहेत. रविवारी सायंकाळी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या एनडीए सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला संधी मिळालेली नाही. विशेष म्हणजे ९ जून हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा स्थापना दिवस आहे. त्याच दिवशी भाजपाकडून मंत्रीपद न दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

 Lok Sabha elections

संग्रहित छायाचित्र

देशात सलग तिसऱ्यांदा सत्तेचा सोपान राखण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यशस्वी झाले आहेत. रविवारी सायंकाळी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या एनडीए सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला संधी मिळालेली नाही. विशेष म्हणजे ९ जून हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा स्थापना दिवस आहे. त्याच दिवशी भाजपाकडून मंत्रीपद न दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पदरी निराशा आली आहे. रविवारी सायंकाळपर्यंत त्यांना फोन आला नाही. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस कॅबिनेट मंत्रीपदावर ठाम असल्याचे माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय मंत्रीमंडळाच्या शपथविधीपूर्वी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मांडली. सुरुवातीला भाजपकडून राष्ट्रवादीला एक मंत्रिपदाची ऑफर दिली होती. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हे पद मिळणार होते. यापूर्वी केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद आमच्याकडे होते. त्यामुळे आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद दिले जावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कॅबिनेट मंत्रीपदावर ठाम असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

भविष्यात मंत्रिमंडळात विस्तार होईल, तेव्हा निश्चितपणे भाजपकडून विचार होईल. आताही त्यांच्याकडून समावेशाचा प्रयत्न केला गेला. त्यांना आमच्याकडून कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती. त्यामुळे आम्हाला पुढच्यावेळेस मंत्रिपद दिले तरी चालेल पण आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद हवे, असेही यावेळी पटेल यांनी सांगितले.

दरम्यान, रविवारी मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी पटेल किंवा सुनील तटकरे  या दोघांनाही फोन न आल्याने तर्कवितर्क लढवले जात होते. त्यातच फडणवीस सकाळी तटकरे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले होते. यावेळी अजित पवार व इतर नेतेही उपस्थित होते. त्यामुळे पडद्यामागे नेमक्या कोणत्या राजकीय घडामोडी घडत आहेत, याबाबत प्रचंड उत्सुकता होती. अखेर फडणवीसांनी काही तासांनी याबाबत उलगडा केला. त्यानुसार पटेल किंवा तटकरे रविवारी शपथ घेणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यांना आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराची वाट पाहवी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांनी शरद पवार यांची साथ सोडत महायुतीत आपली वेगळी चूल मांडली. पहिल्यापासूनच अजित पवारांचा सरकारमध्ये आणि प्रशासनावर नेहमीच दरारा राहिला आहे. या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना सुनिल तटकरेंच्या रुपाने रायगड लोकसभा मतदारसंघात एकच सीट निवडून आणता आली. राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांची केंद्रीय मंत्रीमंडळात निवड होण्याची शक्यता होती. परंतु अचानक राजकीय उलथापालथ झाली आणि मित्र पक्ष असताना देखील मंत्रीपद न दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

विशेष म्हणजे ९ जून हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा स्थापना दिवस असतो. अजित पवारांचे पुण्यावर विशेष प्रेम आहे म्हणूनच की काय अजित पवार महायुतीत गेल्यावर लगेच त्यांना पुण्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा, विशेषत: अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. राष्ट्रवादीने पुण्यात कायम ताकद राखली आहे. अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडत युती सरकारमध्ये एन्ट्री घेतली. मात्र रविवारी झालेल्या शपथविधीत राष्ट्रवादी काँग्रेसला स्थान देण्यात आलेले नाही. नगरसेवक, महापौर असा चढता प्रवास केलेले मुरलीधर मोहोळ पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. पहिल्याच टर्ममध्ये त्यांना मंत्री करण्यात येणार आहे ही अजित पवारांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. मोहोळ यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यात येत आहे. त्या माध्यमातून त्यांच्या मागे भाजप ताकद उभी करत असल्याची चर्चा पुण्यात दबक्या आवाजात सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीत दादांना बसलेल्या धक्क्यांमुळे पुण्यातील राजकीय गणिते बदलली आहेत. त्यामुळे अजित पवारांचं पालकमंत्री राहणार का, अशा चर्चा सुरु असताना मोहोळ यांची मंत्रिपदासाठी झालेली निवड राष्ट्रवादीची चिंता वाढवणारी आहे.

अगोदरच शरद पवारांची सोडलेली साथ, कुटुंबीय विरोधात
लोकसभेच्या निवडणुकीत म्हणावे असे यश मिळाले नाही. मावळ मतदारसंघातून २०१९मध्ये मुलगा पार्थ आणि यंदा पत्नी सुनेत्रा पवार त्यांना निवडून आणता आले नाही. सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसला डावलण्यात आले आहे. मोहोळ यांना देण्यात आलेल्या मंत्रिपदाचा विधानसभेत भाजपला अधिकचा फायदा होणार आहे. त्यामुळे बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुण्यात अजित पवारांचा दरारा राहणार का? अशीही कुजबुज सध्या सुरु आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला एक जागा देण्यात येणार होती. तसा प्रस्ताव आम्ही त्यांना दिला होता. राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार, अशी ही जागी होती. मात्र, त्यांना केंद्रीय मंत्रीपद मिळावे, असा त्यांचा आग्रह होता. आमच्याकडून प्रफुल्ल पटेल यांचे नाव अंतिम करण्यात आले असून ते यापूर्वी मंत्री राहिले आहेत. त्यामुळे त्यांना राज्यमंत्रीपद देता येणार नाही, असे राष्ट्रवादीकडून ( अजित पवार गट) सांगण्यात आले, त्यामुळे केंद्रीय मंत्रीमंडळात अजित पवार गटाचा समावेश नसेल, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. जेव्हा युतीचे सरकार असते तेव्हा काही निकष तयार केले जातात. एका पक्षासाठी असे निकष मोडता येत नाहीत. त्यामुळे भविष्यात जेव्हाही केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार होईल, तेव्हा निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) विचार केला जाईल, यासंदर्भात जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसशी ( अजित पवार गट) बोलणे झाले,  तेव्हा आम्हाला यावेळी शक्य नसेल तर पुढच्या वेळी पण केंद्रीय मंत्रीपद द्या, असे सांगण्यात आले , असे फडणवीस म्हणाले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest