रणसंग्राम २०२४: ‘अब की बार गोळीबार सरकार’

राजकारणात एखाद्याचा स्तर हा समाज ठरवत असतो. समाजातलं आपलं स्थान हे जनता ठरवत असते, असं म्हणत राज्यातील सरकार गोळीबार सरकार असल्याचा हल्लाबोल करत खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे.

संग्रहित छायाचित्र

सुप्रिया सुळे यांनी डागली देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ

राजकारणात एखाद्याचा स्तर हा समाज ठरवत असतो. समाजातलं आपलं स्थान हे जनता ठरवत असते, असं म्हणत राज्यातील सरकार गोळीबार सरकार असल्याचा हल्लाबोल करत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे. 

लोणावळ्यातील कार्यकर्ता मेळाव्यात ज्येष्ठ नेते शरद पवारांनी (Sharad Pawar) आमदार सुनील शेळकेंना (Sunil Shelke) भाषणातून तंबी दिली होती. यावर देवेंद्र फडणवीस  यांनी शरद पवारांनी आपला स्तर पडू देऊ नये, असं भाष्य केले होते.  त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना  प्रत्युत्तर दिलं आहे.

सुळे म्हणाल्या, राज्यासह पुण्यात गुन्हेगारीने कळस गाठला आहे. अनेक ठिकाणी  गोळीबाराच्या घटना समोर आल्या आहेत. पुण्यात सगळ्यात जास्त प्रमाणात ड्रग्स सापडले आहेत. अब की बार गोळीबार सरकार म्हणत त्यांनी राज्यात सुरू असलेल्या गुन्हेगारीविरोधात काम करण्याची मागणी फडवीसांकडे (Devendra Fadanvis) केली आहे. फडणवीसांनी जर राज्यात चांगलं काम केलं असतं तर गुन्हेगारीवर आणि त्यांच्यावर बोलायची वेळ आली नसती, असेही सुळे म्हणाल्या.

‘खोके, गोळीबार, धमकीबाज सरकार’ 

हर्षवर्धन पाटील राज्याचे नेते आहेत.  त्यांना भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षातील  कार्यकर्त्यांकडून  धमक्या येत आहेत. या संबंधातील पत्र गृहमंत्र्यांना लिहावे लागते. असे असतानाही धमकी द्यायची हिंमत  होते, म्हणजेच हे गृहमंत्रालयाचं अपयश आहे. वरिष्ठ नेते मदन बाफना यांना धमकी दिली जात आहे. त्यामुळे अबकी बार गोळीबार सरकार, अशी स्थिती राज्यात निर्माण झाली आहे. सत्तेत असलेले आमदार गोळीबार करत आहेत, नेमकं राज्यात चाललंय काय, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी विचारला.  हे ट्रिपल इंजिनचं सरकार खोके सरकार आहे, गोळीबार सरकार आहे आणि धमकीबाज सरकार आहे. विरोधकांपासून ते मित्र पक्षांपर्यंत सगळ्यांनाच या सरकारमधील धमक्या देतात, असा आरोप सुळे यांनी केला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest