शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर, आठ उमेदवारांची नावे स्पष्ट; मावळमधून श्रीरंग बारणेंच्या नावावर शिक्कामोर्तब

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून एकूण आठ उमेदवार निश्चित करण्यात आले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे यांचे नाव जाहीर झाले

संग्रहित छायाचित्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून एकूण आठ उमेदवार निश्चित करण्यात आले आहे.  मावळ लोकसभा मतदारसंघातून (Maval Lok Sabha) श्रीरंग बारणे यांचे नाव जाहीर झाले असून  हातकणंगले  येथून धैर्यशील माने यांच्या नावावार शिक्कामोर्तब झाले आहे. 

महाविकास आघाडीकडून याआधीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांची मावळ लोकसभा मतदारसंघासाठी वर्णी लागली आहे. मात्र, दुसरीकडे खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीची फक्त चर्चाच सुरू होती.  दरम्यान, आज एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून बारणे  यांचे नाव निश्चित झाले असून मावळात  दोन्ही शिवसेना एकमेकांच्या विरोधात ठाकलेल्या दिसणार आहे. 

शिवसेनेकडून ८ उमेदवारांची यादी जाहिर

दक्षिण मध्य - राहुल शेवाळे

कोल्हापूर - संजय मंडलिक

शिर्डी - सदाशिव लोखंडे

बुलढाणा - प्रतापराव जाधव

हिंगोली - हेमंत पाटील

रामटेक - राजू पारवे

हातकणंगले - धैर्यशील माने

मावळ - श्रीरंग आप्पा बारणे (Shrirang Barne)

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest