माझ्या पोलिसावर कोणी हात उचलला तर, मी सहन करणार नाही, असे फडणवीसांनी बोलावे ; सुप्रिया सुळे

कर्तव्यावर असलेल्या पोलिसाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकाऱ्याला भाजपचे आमदार सुनिल कांबळे यांनी मारहाण केल्याचे समोर आल्याने चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे. त्यावर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील संपात आणि निषेध व्यक्त केला असून माझ्या पोलिसावर कोणी हात उचलला तर, मी सहन करणार नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे येवून बोलायला हवे, अशी आपेक्षा व्यक्त केली आहे.

PuneMirror

संग्रहित छायाचित्र

कर्तव्यावर असलेल्या पोलिसाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकाऱ्याला भाजपचे आमदार सुनिल कांबळे यांनी मारहाण केल्याचे समोर आल्याने चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे. त्यावर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील संपात आणि निषेध व्यक्त केला असून माझ्या पोलिसावर कोणी हात उचलला तर, मी सहन करणार नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे येवून बोलायला हवे, अशी आपेक्षा व्यक्त केली आहे.

ससून रुग्णालयातील एका कार्यक्रमात भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी केली. तसेच एका पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायलर झाला आहे. यामुळे कांबळे यांच्यावर टीकेची झोड उठली असून चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, या घटनेवरुन सुळे यांनी भाष्य केले असून पुणे हे शहर सुसंस्कृत शहर आहे. पुणेकरांना त्यांच्या संस्कृतीचा, भाषेचा तसेच अनेक गोष्टीचा अभिमान आहे. पुणेकरांना सगळ्या गोष्टींचा सार्थ अभिमान आहे. प्रत्येक शहराची वेगळी संस्कृती असून  ओळख आहे. अशा शहरात अशी घटना घडणे हे योग्य नाही. पुण्यामध्ये ससून हॉस्पिटलच्या कार्यक्रमात सत्तेत असलेल्या जबाबदार व्यक्तीने पोलिसांना जी वागणूक दिली ते एका बेजबाबदार व्यक्तीलाही शोभत नाही. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे आहे. वर्दीला काही मान सन्मान आहे. पोलिसासह दुसऱ्या पक्षातील माणसाला मारणं देखील चुकीचं आहे. राज्यातल्या पोलीस दलाचा मला अभिमान आहे, यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुळे म्हणाल्या की, "मी राज्यात जितक्या जितक्या कॉन्फिडंटली फिरते, तशी दुसऱ्या राज्यात फिरत नाही. मला राज्य पोलीस दलावर विश्वास आहे. भाजपासोबत आमचे मतभेत मनभेद नाही, जी घटना पुण्यात झाली त्याचा मी निषेध करते".

मिर्जापुर आणि पुण्यात काय फरक आहे, या सगळ्या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांना जाहीर पत्र लिहिणार आहे. तुम्ही जर कारवाई करणार नसाल तर कसं चालेल. तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम रामाचं नाव घेता तर तुमच्या पक्षाला अगोदर ती संस्कृती शिकवा. आपण आशा घटना का सहन करायच्या असा प्रश्न उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांचा मला आदर त्यांनी समोर येऊन बोलायला हवं होतं की माझ्या पोलिसावर कोणी हात उचलला तरी मी सहन करणार नाही. अशी आपेक्षा यावेळी त्यांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान, भाजपचे आमदार सुनील कांबळे यांच्याविरुद्ध शुक्रवारी मध्यरात्री बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र कांबळे यांनी मारहाण केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याने अद्याप कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही

नेमके काय होते प्रकरण..

पोलिस कर्मचारी शिवाजी सरक हे व्यासपीठाजवळील पायऱ्यांजवळ थांबले होते. कार्यक्रम संपल्यानंतर आमदार कांबळे तेथील पायऱ्यांवरून खाली उतरत असताना त्यांचा तोल गेला. त्यावेळी कांबळे यांनी साध्या वेशात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या गालावर जोराचा फटका मारला. या घटनेचा व्हिडिओ चांगलाचा व्हायरल झाला होता. एका कर्तव्यावर असलेल्या पोलिसाला मारहान केल्याने आमदारावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी राजकीय पक्ष तसेच नागरिकांनी केली होती. दरम्यान, कांबळे यांनी अन्य एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) वैद्यकीय मदत सेलचे प्रमुख जितेंद्र सातव यांनाही फटका मारला होता. याबाबत अद्याप तक्रार प्राप्त झालेली नाही. अखेर शुक्रवारी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest