रविकांत तुपकर यांची 'स्वाभिमानी शेतकरी संघटने'तून हकालपट्टी; शिस्तभंग समितीने केली कारवाई

रविकांत तुपकर यांची  स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेले रविकांत तुपकर यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात भूमिका घेतली होती.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Mon, 22 Jul 2024
  • 05:09 pm
Ravikant Tupkar, Swabhimani Shetkar Sangathana, Raju Shetty

संग्रहित छायाचित्र

रविकांत तुपकर यांची  स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेले रविकांत तुपकर यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात भूमिका घेतली होती.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर जाधव तसेच पक्षाचे इतर सदस्य आणि पदाधिकाऱ्यांची पुण्यामध्ये बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत हा निर्णय जाहीर केला. तुपकर हे  पक्षविरोधी काम करत असल्याचा ठपका ठेपत शिस्तभंग समितीने हा  निर्णय घेतला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील म्हणाले, विधानसभा निवडणूका तोंडावर आहेत. अशावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका काय असावी याबद्दल चर्चा करण्यासाठी  आणि रविकांत तुपकर यांनी स्वत:चा मानलेला सवता सुभा यावर चिंतन करण्यासाठी राज्यातील सगळ्या जिल्हा अध्यक्षांना बोलवून बैठकीचं आयोजन केलं होतं. गेली चार वर्ष रविकांत तुपकर  यांना त्यांचं म्हणणं  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याजवळ मांडा नाहीतर त्यांनी नेमलेल्या शिस्तपालन समिती समोर मांडा असं सांगण्यात येत होतं. मात्र वारंवार असं सांगून सुद्धा रविकांत तुपकर मीडियातून सतत आरोप करत राहिले. मीडिया हे न्याय निवाड्याचं माध्यम नाही. तुम्ही मीडियातून आपले प्रश्न मांडण्यापेक्षा जर तुम्ही चळवळीतल्या एका छत्रछायेखाली येऊन आपलं म्हणणं मांडलं असतं तर निश्चितपणे यातून चांगला मार्ग निघाला असता. 

पाटील पुढे म्हणाले की, गेली तीन-चार वर्षे आम्ही वाट पाहत आहोत. गेल्या चार वर्षात तुपकर एकाही ऊस परिषदेला हजर नव्हते. कोणत्याही आंदोलनात अथवा कार्यकारिणीत सहभागी देखील झाले नव्हते. तुपकर यांनी  २०२४ ची लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून स्वतःच्या बळावर लढवली. या सगळ्या गोष्टीचा विचार करून  स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी  रविकांत तुपकर यांचे असणारे संबंध आम्ही संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest