संग्रहित छायाचित्र
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात युती आणि आघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेतली आहे. वंचितने आपल्या 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात छत्रपती संभाजीनगर मध्य, कल्याण पश्चिम, परभणी, हडपसर, मान, सांगली या महत्त्वाच्या मतदारसंघाचाही समावेश आहे. यापूर्वी वंचित बहुजन आघाडीने 11 उमेदवारांची यादी जाहीर केली होती.
उमेदवारांची यादी वाचा सविस्तर
छत्रपती संभाजीनगर मध्य - मोहम्मद जावेद मोहम्मद इसहाक
गंगापूर - सय्यद गुलाम नबी सय्यद
कल्याण पश्चिम - अयाज गुलजार मोलवी
हडपसर - ॲड. मोहम्मद अफरोज मुल्ला
माण - इम्तियाज जाफर नदाफ
शिरोळ - आरिफ महामदअली पटेल
सांगली - अल्लाउद्दीन हयातचंद काझी
मलकापूर - शहेजाद खान सलीम खान
बाळापूर - खतीब सय्यद नतीकुद्दीन
परभणी - सय्यद सामी सय्यद साहेबजान
यापूर्वी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत पक्षाने रावेर विधानसभा मतदारसंघात शमिभा पाटील यांना उमेदवारी दिली आहे. शमिभा या ट्रान्सजेंडर आहेत.