भाजपला मिळाला जम्मूत नवा आश्वासक चेहरा

जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्ता मिळवता आली नसली तरी जम्मूमध्ये भाजपला चांगले यश मिळाले आहे. काश्मीर खोऱ्यात भाजपला यश मिळणार नाही हे अपेक्षित होते.

BJP, promising, face ,Jammu,Kashmir,Assembly elections

शगुन परिहार

शगुन परिहार यांनी मारली मुस्लीमबहुल भागात बाजी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्ता मिळवता आली नसली तरी जम्मूमध्ये भाजपला चांगले यश मिळाले आहे. काश्मीर खोऱ्यात भाजपला यश मिळणार नाही हे अपेक्षित होते. मात्र जम्मूतुन विजयी झालेल्या शगुन परिहार या युवा नेत्यामुळे भाजपला स्वतःचा नवा नेता मिळाला आहे.

कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधी ही पहिलीच निवडणुक होती. ज्यामध्ये भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण जनतेच्या मनात याबाबत कोणताही रोष नसल्याचे समोर आले आहे. जम्मूमध्ये भाजपने एका तरुण उमेदवाराला संधी दिली होती. जिचे वडील आणि काका यांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती.

किश्तवाड मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाची उमेदवार शगुन परिहार यांनी विजय मिळवला. परिहार यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या सज्जाद अहमद किचलू यांचा ५२१ मतांनी पराभव केला आहे. सहानुभूतीच्या लाटेत शगुन परिहार विजयी होतील, हा भाजपचा अंदाज खरा ठरला आहे. किश्तवाडा विधानसभा मतदारसंघात मुस्लीम लोकसंख्या मोठी आहे, त्यामुळे भाजपने दोन्ही समाजाच्या लोकांचा पाठिंबा मिळेल, अशा चेहऱ्याला संधी दिली. शगुन परिहार यांना उमेदवारी दिल्याने दोन धार्मिक गटांमधील दरी कमी होईल, अशी भाजपची अपेक्षा होती.

पहिल्याच निवडणुकीत यश

शगुन परिहार यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर शगुन परिहार म्हणाल्या की, मी परिसरात समृद्धी आणि शांतता नांदावी यासाठी प्रयत्न करणार आहे. शगुन परिहार यांचे कुटुंब सुरुवातीपासून भाजपशी संबंधित होते. त्यांचे काका अनिल परिहार हे जम्मू-काश्मीरमधील भाजपचे प्रमुख नेते होते. ते जम्मू-काश्मीर भाजपचे सचिव होते.

नोव्हेंबर २०१८ मध्ये शगुन परिहारचे वडील अजित परिहार आणि काका अनिल परिहार यांची किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.  शगुन परिहार यांनी एम.टेक केले असून त्या जम्मू-काश्मीर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचीही तयारी करत आहेत. वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest