आईच्या प्रचारासाठी मुलगी मैदानात; बारामतीत सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती पाहिल्यांदाच दिसल्या प्रचारात

वाढत्या उन्हासोबतच लोकसभेच्या राजकीय प्रचाराचा जोर देखील वाढत दिसत आहे. उमेदवार ठिकठिकाणी भेट देवून मतदारांच्या भेटीगाठी घेत आहे. अशातच देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात मुलगी स्वत: आपल्या आईच्या प्रचारासाठी उतरल्याचे दिसून आले आहे.

Revati Sule

सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती पाहिल्यांदाच दिसल्या प्रचारात

वाढत्या उन्हासोबतच लोकसभेच्या राजकीय प्रचाराचा जोर देखील वाढत दिसत आहे. उमेदवार ठिकठिकाणी भेट देवून मतदारांच्या भेटीगाठी घेत आहे. अशातच देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात मुलगी स्वत: आपल्या आईच्या प्रचारासाठी उतरल्याचे दिसून आले आहे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार आणि बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे  (Revati Sule) आपल्या आईच्या प्रचारात उतरल्याचे बघायला मिळाल्याने त्या एकच चर्चेचा विषय बनल्या आहेत. रेवती सुळे प्रथमच युगेंद्र पवार यांच्यासोबत  प्रचारात सहभागी झाल्याचे दिसून आले. रेवती आणि युगेंद्र यांनी एका पदयात्रेत सहभागी होत सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला. आईच्या प्रचारासाठी स्वत: मुलगी मैदानात उतरल्याने सर्वांचेच लक्ष वेधले गेले. 

रेवती सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी आज बारामती शहरातून पदयात्रा काढत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा प्रचार केला. महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे तर महायुतीकडून सुनेत्रा पवार ह्या एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.  उमेदवारांचा प्रचारात  दोन्ही बाजूंनी कुटुंबातील सदस्य उतरल्याचे दिसून येत आहे. तसेच, आजपर्यंत प्रचारात कधीही न दिसलेल्या रेवती सुळे या एकदमच बारामतीच्या रस्त्यांवर प्रचार करताना दिसल्याने चर्चेचा विषय ठरल्या आहे. 

बारामतीतून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी त्यांचे चिरंजीव पार्थ पवार हे देखील प्रचार करत आहे.  बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत संपूर्ण पवार कुटुंबच उतरल्याचे दिसून येत आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest