संग्रहित छायाचित्र
नागपूर : नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज विधान परिषदेत सन्माननीय सदस्य महादेव जानकर यांनी महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री तुळजाभवानी देवीचा सोन्याचा मुकुट व इतर दागिने गहाळ झाले आहेत. यामधील आरोपींवर गुन्हे दाखल करण्याबाबत औचित्याचा मुद्दा जानकर यांनी उपस्थित केला.
यावर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तत्परतेने शासनाचे याविषयाकडे लक्ष वेधले. तसेच सदर प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी तक्रार देवून ही अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगितले. त्यामुळे हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, असे शासनास निर्देश दिले.
यावर मंत्री गिरीश महाजन यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच कारवाई करण्यात येईल, असे सभागृहाला आश्वासन दिले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.