पुणे, शिरूरमध्ये दिले उमेदवार, बारामतीत मात्र वंचितचा सुळेंना पाठिंबा!

वंचित बहुजन आघाडीकडून बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्यात आला आहे. यासंदर्भात वंचितने एक पत्रक प्रसिद्ध केले आहे.

Vanchit Bahujan Aghadi

संग्रहित छायाचित्र

वंचित बहुजन आघाडीकडून बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना पाठिंबा देण्यात आला आहे. यासंदर्भात वंचितने एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे तर  शिरूर लोकसभेसाठी मंगलदास बांदल यांची नावे वंचितकडून जाहीर केली करण्यात आली असून बारामती मतदारसंघात मात्र उमेदवार न देता महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचं पक्षाने ठरवलं आहे.  (Vanchit Bahujan Aghadi)

महाविकास आघाडीसोबत युती करण्याचा वंचित बहुजन आघाडीने प्रयत्न केला. परंतु जागावाटपाबाबत एकमत न झाल्याने त्यात यश आले नाही. त्यामुळे वंचितने आपली स्वतंत्र यादी प्रसिद्ध केली असून पुण्यातून वसंत मोरे तर  शिरूरमधून मंगलदास बांदल या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यामुळे वंचितची ताकद बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी उभी राहणार हे आता स्पष्ट झाले आहे. 

२०१९ साली बारामती लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि भाजपच्या कांचन राहुल कुल यांच्यात थेट लढत झाली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना ६ लाख ८६ हजार ७१४ मतदान झालं होतं तर भाजपच्या कांचन राहुल कुल यांना ५ लाख ३० हजार ९४० इतकं मतदान झालं होतं. सुळे या  १ लाख ५५ हजार ७७४ मतांनी निवडून आल्या होत्या. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे नवनाथ पडळकर यांना ४४ हजार १३४ मतदान झालं होतं. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे. याचा सुळे यांना किती फायदा होतो हे येणारा काळंच ठरवेल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest