भाजपचे राजेंद्रकुमार गावित फुंकणार तुतारी

नंदुरबार: राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहात असून अनेक नेत्यांनी राज्यात दौरे सुरू केले आहेत. महायुती व महाआघाडीत घटक पक्षांमध्ये जागावाटपाच्या चर्चा सुरू असतानाच अनेक नेते पक्ष बदलत आहेत. शरद पवारांनी अनेक नेत्यांना गळाला लावत महायुतीसमोर मोठं आव्हान निर्माण केलं आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 30 Sep 2024
  • 02:30 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

विधानसभेच्या तोंडावर नंदूरबारमध्ये भाजपला धक्का, पाडवींचे तिकीट नक्की झाल्याचा अंदाज घेत गावित यांची पक्षाला सोडचिठ्ठी

नंदुरबार: राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहात असून अनेक नेत्यांनी राज्यात दौरे सुरू केले आहेत. महायुती व महाआघाडीत घटक पक्षांमध्ये जागावाटपाच्या चर्चा सुरू असतानाच अनेक नेते पक्ष बदलत आहेत. शरद पवारांनी अनेक नेत्यांना गळाला लावत महायुतीसमोर मोठं आव्हान निर्माण केलं आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नंदूरबारमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. मंत्री विजयकुमार गावित यांचे भाऊ आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत शहादा-तळोदा मतदारसंघातून आगामी निवडणूक लढण्याचा इरादा जाहीर केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र गावित कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र महायुतीत भाजपकडून तिकीट मिळणार नसल्याची खात्री असल्याने त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.  शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास राजेंद्रकुमार गावित इच्छुक आहेत. मात्र येथून भाजपचे राजेश पाडवी आमदार आहेत. आगामी निवडणुकीतही भाजपकडून त्यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. राजेंद्रकुमार गावित यांनी २०१४ ची विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवली होती. मात्र त्यात त्यांचा ११ हजार मतांनी पराभव झाला होता. निवडणुकीनंतर त्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०१९ मध्ये त्यांनी निवडणूक लढण्याची तयारी केली होती, मात्र भाजपने शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघातून राजेश पाडवींना तिकीट दिलं. यामुळे आता गावित पुन्हा स्वगृही परतण्याची शक्यता आहे. शहाद्यात राजेंद्रकुमार गावित यांचा मोठा कार्यकर्ता गट आहे. गावित दुसऱ्या पक्षात गेल्यास भाजपला येथे मोठा धक्का बसू शकतो. त्यातच चर्चा सुरू आहे की, राजेंद्रकुमार गावित शरद पवार गटात जाण्याची शक्यता आहे.

आमदार बबनराव शिंदे यांचा पुतण्या शरद पवारांच्या गळाला

तानाजी सावंतच्या पुतण्यानंतर आता शरद पवारांच्या गळाला आणखी एक राजकीय पुतण्या लागला आहे. या पुतण्याने त्याच्या आमदार काकांविरोधातच विधानसभेसाठी दंड थोपटले असून राष्ट्रवादीची तुतारी हातात घेण्याची तयारी सुरू केली आहे. माढा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात पुतण्या धनराज शिंदे यांनी तयारी सुरू करत मतदारसंघात दौरे वाढवले आहेत. धनराज शिंदे यांनी माढा विधानसभेतून निवडणुकीच्या रिंगणात आपल्या चुलत भावाच्या किंवा चुलत्याच्या विरोधात लढण्याचे संकेत दिले आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest