Ayodhya: अयोध्येतील प्रमुख चौकाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव द्या; मनसेची पंतप्रधानांकडे मागणी

मुंबई: २२ जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. अयोध्या तसेच देशभरात राम भक्तांमध्ये

Narendra Modi

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष सतीश नारकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले पत्र

मुंबई: २२ जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. अयोध्या तसेच देशभरात राम भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

या पार्श्वभूमीवर आता नवीन माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष सतीश नारकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी अयोध्येतील प्रमुख चौकाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी केली आहे. (MNS)

उद्धव ठाकरे यांना अयोध्येतील २२ जानेवारीच्या कार्यक्रमाचे निमंत्रण न मिळाल्याने वाद निर्माण झाला होता. यावर मला अयोध्येला जाण्यासाठी कोणत्याही निमंत्रणाची गरज नाही. मी केव्हाही अयोध्येला जाऊ शकतो. जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा अयोध्येला गेलो होतो. त्यापूर्वीही गेलो होतो असे ते म्हणाले होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest