आता अमृता मॅम नाही, माँ अमृता संबोधणार!; भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांचे आश्चर्यजनक विधान

राज्य विधानसभेची निवडणूक जवळ आली असली तरी त्याची घोषणा अद्याप झालेली नाही. घोषणा कधीही होणार असल्याने विविध राजकीय नेते वेगवेगळी विधाने करत मनोरंजन विश्वात सहभागी होत असतात.

File Photo

राज्य विधानसभेची निवडणूक जवळ आली असली तरी त्याची घोषणा अद्याप झालेली नाही. घोषणा कधीही होणार असल्याने विविध राजकीय नेते वेगवेगळी विधाने करत मनोरंजन विश्वात सहभागी होत असतात. राज्य मंत्रिमंडळात असलेले भाजपचे एक मान्यवर सदस्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल एक वक्तव्य आता असेच चर्चेचा विषय ठरले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या पत्नी यांच्याविषयी बोलताना आपण त्यांना मॅम नाही, माँ अमृता संबोधणार असल्याचे वक्तव्य केले आहे.       

मुंबईत अनंत चतुर्दशीनंतर दुसऱ्यादिवशी चौपाट्यांवर स्वच्छता मोहीम राबवली जाते. विविध सामाजिक संस्था यामध्ये पुढाकार घेतात. काही सेलिब्रिटी, राजकारणीही त्यात सहभागी होतात. बुधवारी  मुंबईत एका चौपाटीवर असाच स्वच्छता मोहिमेचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि भाजपा नेते मंगलप्रभात लोढा सहभागी झाले होते. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, अमृता फडणवीस यांनी चौपाटी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतलाय, तसं त्यांनी राजकारणातील कचरा साफ करण्यासाठी पुढाकार घ्यावा.

अमृता मॅमना मी विनंती करतो की, तुम्ही बीचवरचा कचरा साफ करता हे चांगलं काम आहे. अशीच महाराष्ट्राच्या राजकारणात घाण झाली आहे, ती साफ करण्यासाठी पुढाकार घ्यावा. महाराष्टाच राजकारण स्वच्छ करावं, यासाठी आपणास विनंती करतो. अमृताताईंनी आता माँ च रुप घेतल आहे. आजपासून मी त्यांना मॅम नाही, माँ अमृता संबोधणार” असं मंगलप्रभात लोढा म्हणाले. अमृता फडणवीस यांचं कौतुक करताना त्यांनी असे तारे तोडले. अमृता फडणवीस यावेळी म्हणाल्या, ‘लेटस बी पार्ट ऑफ सोल्युशन, नॉट पोल्युशन’ म्हणजे प्रदूषण करायचं नाही, उपाय शोधायचा. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना मी कचरा करणार नाही, अशी शपथ दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest