विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर, ११ उमेदवारांच्या नावाची घोषणा

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर करून टाकली आहे. पक्षाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही नावे जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीत वंचितने ११ उमेदवारांची घोषणा केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Sat, 21 Sep 2024
  • 04:25 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच पहिली यादी जाहीर, ११ उमेदवारांच्या नावाची घोषणा

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) आपली पहिली उमेदवार यादी जाहीर करून टाकली आहे. पक्षाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही नावे जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीत वंचितने ११ उमेदवारांची घोषणा केली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्यास अद्याप कालावधी आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधकांच्या महाविकास आघाडीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे.  त्यादरम्यान विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच उमेदवार जाहीर करण्यात वंचित बहुजन आघाडीने ‘आघाडी’ घेतली आहे.

यामध्ये रावेर, सिंदखेड राजा, वाशिम, धामणगाव रेल्वे, नागपूर दक्षिण पश्चिम, साकोली, नांदेड दक्षिण, लोहा, छत्रपती संभाजीनगर पूर्व, शेवगाव, खानापूर या मतदारसंघांचा समावेश आहे.

उमेदवारी आणि मतदारसंघ यादी
रावेर – शमिभा पाटील,
सिंदखेड राजा – सविता मुंढे,
वाशिम- मेघा किरण डोंगरे,
धामणगाव रेल्वे – निलेश विश्वकर्मा, 
नागपूर दक्षिण पश्चिम – विनय भांगे,
साकोली – डॉ. अविनाश नन्हे,
नांदेड दक्षिण- फारुक अहमद,
लोहा – शिवा नरंगले,
छत्रपती संभाजी नगर पूर्व – विकास दांडगे,
शेवगाव – किसन चव्हाण,
खानापूर – संग्राम माने

आमच्यावर काहीही आरोप होत असले तरी आम्ही राज्यात सध्या सर्वच प्रमुख पक्षांचं सुरू असलेलं एकजातीय राजकारण मोडून काढण्यासाठी विविध समाजातील उमेदवारांना संधी दिली असल्याचं  प्रकाश आंबेडकर  यांनी पत्रकार परिषदे म्हटलं आहे. 

प्रकाश आंबेडकर  यावेळी म्हणाले की  वंचित जाती समूहांचे प्रतिनिधी पहिल्या यादीत दिले आहे. येत्या काही दिवसांत दुसरी यादी जाहीर करण्यात येईल. आणखी काही पक्ष लवकरच आमच्या आघाडीत सामील होतील.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest