Ashok Chavan : अशोक चव्हाणांचा निर्णय 'आदर्श'मुळे ? आणखी रोमांचक घडामोडी?

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसचा राजीनामा (Congress) देण्यामागील कारणांवर आता चर्चा चालू आहेत.अशोक चव्हाण आदर्श घोटाळा (Adarsh scam) लपवण्यासाठी भाजपात गेले की काय,

Ashok Chavan

अशोक चव्हाणांचा निर्णय 'आदर्श'मुळे ? आणखी रोमांचक घडामोडी?

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसचा राजीनामा (Congress) देण्यामागील कारणांवर आता चर्चा चालू आहेत.अशोक चव्हाण आदर्श घोटाळा (Adarsh scam) लपवण्यासाठी भाजपात गेले की काय, असं म्हणत शिवसेनेचे (ठाकरे) उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी असा दावा केला आहे की, भाजपाने श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून अशोक चव्हाण यांना ब्लॅकमेल केलं असावं.अशोक चव्हाण काँग्रेस सोडून गेले, कारण केंद्र सरकार, राज्य सरकार श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांना ब्लॅकमेल करत आहे. लोकांना घाबरवत आहे, काँग्रेसच्या नेत्यांनाही घाबरवून भाजपात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपामध्ये इतकी असुरक्षितता आहे की ते अजूनही सगळ्या पक्षातील लोकांना फोडून आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, मूळचे त्यांचे लोक कमी आणि बाहेरचेच लोक जास्त झाले आहेत. काहीही करून सत्तेत राहण्याची त्यांची धडपड चालू आहे. त्यातच ब्लॅकमेल करून त्यांनी अशोक चव्हाण यांना आपल्याकडे घेतलं असेल. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत भारतीय अर्थव्यवस्थेशी संबंधित श्वेतपत्रिका सादर केली. अर्थमंत्रालयाने तयार केलेल्या या श्वेतपत्रिकेत यूपीए आणि एनडीए सरकारच्या १० वर्षांच्या कार्यकाळातील अर्थव्यवस्थेची तुलना करण्यात आली आहे. या ५८ पानांच्या या श्वेतपत्रिकेत यूपीए सरकारच्या कार्याचे वाभाडे काढण्यात आले आहेत.श्वेतपत्रिकेच्या दुसऱ्या भागात म्हणजेच यूपीए सरकारच्या कार्यकाळातील घोटाळ्यांबाबतच्या भागात आदर्श घोटाळ्याचा उल्लेख करण्यात आला आहे. आदर्श घोटाळ्यात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं नाव आलं होतं. त्यामुळे चव्हाण यांना मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं होतं. वय साथीला नसतानाही शरद पवार आपल्यासमोरील आव्हान पेलण्याच्या तयारीत आहेत. गेल्या विधानसभेलाही त्यांच्यातील या जिद्दीला आणि निर्धाराला युवावर्गाने साथ दिली होती. हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात कठीण काळ आहे. राष्ट्रीय राजकारणाला प्राधान्य दिल्यानंतर आता त्यांना पुन्हा प्रादेशिक पातळीवर उतरावे लागणार आहे. थोडक्यात, राज्यातील या राजकीय थरारपटाचा नेमका कुणाला फायदा होईल, हे आत्ताच सांगता येणार नाही. त्यासाठी आणखी काही रोमांचक घडामोडी घडू शकतात. राजकारणाची वाटचाल नाट्यमय घडामोडींवर आणि त्याला सामान्य कसा प्रतिसाद देतात त्यावर अवलंबून असते. राजकारणातील या धक्कादायक घडामोडीमुळे राज्याची प्रतिमा, धोरण आणि राज्यकारभाराचे मोठे नुकसान झाले आहे. वरवर पाहिले तर सामान्य नागरिक यावर तातडीने प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत नाही. मात्र, योग्य वेळी मत व्यक्त करण्याची संधी ते साधतात, हे आपण २०१९ च्या विधानसभेवेळी पाहिले आहे. शत-प्रतिशत भाजपा हे ध्येय साध्य करण्यासाठी गेल्या विधानसभेला विरोधकांची आघाडी मोकळी करूनही त्यांना सत्तेपासून दूर राहावे लागले होते हे विसरून चालणार नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest