'वंचित'कडून पाच उमेदवारांची घोषणा; पुण्यातून वसंत मोरे यांना उमेदवारी

वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरे यांना पुणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे पुण्यातील लढत आता तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

संग्रहित छायाचित्र

वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) वसंत मोरे यांना पुणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे पुण्यातील लढत आता तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, शिरूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. एकूण पाच उमेदवारांची यादी वंचितने जाहीर केली आहे. 

वसंत मोरे (Vasant More) यांनी नुकताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकला. यापूर्वी ते तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच मनसेच्या पुणे शहराध्यक्षपदीही त्यांनी काम केले होते. 2019 मध्ये त्यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. परंतु पक्षांतर्गत  कुरघोड्यांचे कारण देऊन ते मनसेतून बाहेर पडले. 

पुणे लोकसभेत आता तिरंगी लढत बघायला मिळणार आहे. भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर  आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांच्यात तिरंगी  लढत होणार आहे

वंचित बहुजन आघाडीने पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. 

अविनाश भोसिकर - नांदेड,

बाबासाहेब भुजंगराव उगले - परभणी, 

अफ्सर खान - छत्रपती संभाजीनगर, 

वसंत मोरे-पुणे, 

मंगलदास बांदल-शिरुर

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest