आंबेडकरांच्या वंचितला उमेदवार माघारीचे ग्रहण!

भारतीय जनता पक्षाबरोबर काँग्रेसलाही फक्त वंचित बहुजन आघाडीच लढत देऊ शकते, तसेच तिसरा पर्याय ठरू शकते असा दावा करणाऱ्या ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला उमेदवारांच्या माघारीचे ग्रहण लागले आहे.

Lok Sabha Election 2024

संग्रहित छायाचित्र

वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या ३४ उमेदवारांपैकी ९ जणांनी घेतली ऐनवेळी माघार

भारतीय जनता पक्षाबरोबर काँग्रेसलाही फक्त वंचित बहुजन आघाडीच (Vanchit Bahujan Aghadi) लढत देऊ शकते, तसेच तिसरा पर्याय ठरू शकते असा दावा करणाऱ्या ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीला उमेदवारांच्या  माघारीचे ग्रहण लागले आहे. वंचितने लोकसभेसाठी आत्तापर्यंत ३४ उमेदवार जाहीर केले असून त्यातील . त्यातील नऊ उमेदवारांनी ऐनवेळी रणांगणातून माघार घेतली आहे. यामुळे मिळेल तो उमेदवार देण्याची वेळ वंचितवर अनेक ठिकाणी आली आहे.

शिरुरमध्ये मंगलदास बांदल हे महायुतीच्या व्यासपीठावर गेल्याने त्यांची उमेदवारी रद्द करत तेथे अफताब शेख यांना उमेदवारी दिली गेली. दिंडोरीमध्ये गुलाब बर्डे यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यांनी ऐनवेळी नकार दिल्याने मालती थविल यांना उमेदवारी दिली. रामटेकमध्ये शंकर चहांदे यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र काँग्रेसचे बंडखोर किशोर गजभिये यांना वंचितने नंतर उमेदवारी दिली. यवतमाळ-वाशिममध्ये सुभाष पवार यांनी प्रकृतीच्या कारणास्तव माघार घेतली. वंचितने तेथे अभिजीत राठोड यांना उमेदवारी दिली. मात्र त्यांचा अर्ज अवैध ठरला. त्यामुळे अपक्ष उमेदवार अनिल राठोड यांना पाठिंबा वंचितने दिला. (Lok Sabha Election 2024)

अमरावतीमध्ये प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र आंबेडकर यांचे बंधू आनंदराज तेथे रिपब्लिकन सेनेचे उमेदवार म्हणून उभे राहिले. त्यामुळे तेथे आनंदराज यांना पाठिंबा द्यावा लागला. सोलापूरमध्ये राहुल गायकवाड यांनी पक्षनेतृत्वावर आरोप करत उमेदवारी मागे घेतली. जळगावमध्ये प्रफुल्ल लोढा यांनी ऐनवेळी लढण्यास नकार दिला. आता तेथे युवराज जाधव यांना उमेदवारी दिली आहे. उत्तर-मध्य मुंबईतून अब्दुल खान यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यांना आता दक्षिण- मध्यमधून लढण्यास सांगण्यात आले आहे. परभणीत बाबासाहेब उगले यांना उमेदवारी जाहीर झाली होती. तेथे आता पंजाबराव डख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

नऊ मतदारसंघात वंचितने कोणत्या ना कोणत्या कारणांनी उमेदवार बदलले आहेत, त्यातील बहुतांश मतदारसंघ राखीव आहेत. वंचितने ३४ उमेदार उभ केले आहेत. बारामती, नागपूर, यवतमाळ-वाशिम, अमरावती, भिवंडी, कोल्हापूर या ६ मतदारसंघात इतर पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा दिला. आता निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील उमेदवारीबाबत पक्षात खल सुरू आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest