अजित पवार आणि सुनेत्रा पवारांनी घेतले दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन

बारामती लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन आरती केली. सुनेत्रा पवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून

Lok Sabha Election 2024

संग्रहित छायाचित्र

बारामती लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन आरती केली.  सुनेत्रा पवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

राज्यातील निवडणूक चांगल्या वातावरणात पार पाडाव्या आणि महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत आणि नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधान व्हावेत अशी प्रार्थना गणरायाकडे केल्याचे अजित पवारांनी यावेळी बोलताना सांगितले.  तर जनसामान्यांची सेवा करण्याची संधी मिळू दे आणि मोठा विजय मिळू दे अशी प्रार्थना केल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. 

अजित पवार यांनी काल मी तुम्हाला निधी देतो तुम्ही कचाकचा बटन दाबा आणि महायुतीला निवडून द्या असे विधान केले होते. त्याबद्दल विचारले असता  मी त्या ठिकाणी गमतीने हसत हसत तसे विधान केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोणत्याही गोष्टीचा ‘ध’ चा ‘मा’ करू नका, समोर डॉक्टर आणि  वकील मंडळी होती. मागील उमदेवारापेक्षा चांगला निधी देऊन अधिक चांगले काम करू हे सांगण्याचा तो प्रयत्न होता, अशी भूमिका यावेळी अजित पवार यांनी यावेळी बोलताना मांडली. 

दरम्यान, महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) तीन उमेदवारही आजच अर्ज भरणार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर हे आज उमेदवारी अर्ज भरणार असून यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. आज सकाळी साडेदहा वाजता जिल्हाधिकारी  कार्यालयात हे तिन्ही उमेदवार अर्ज भरणार असून त्यानंतर रास्ता पेठ येथील हॉटेल  शांताईसमोर महाविकास आघाडीची सभा होणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest