नायब सिंह सैनी यांनी घेतली हरयाणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

नायब सिंह सैनी यांनी गुरुवारी हरयाणाच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पंचकुला येथील दशहरा मैदानात हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Thu, 17 Oct 2024
  • 05:00 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

नायब सिंह सैनी यांनी घेतली हरयाणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

नायब सिंह सैनी यांनी गुरुवारी हरयाणाच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पंचकुला येथील दशहरा मैदानात हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते. 

हरयाणामध्ये नवीन सरकार स्थापन झाले आहे. नायब सिंह सैनी हे पुन्हा एकदा हरयानाच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. आज त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सैनी यांच्यासोबत १४ आमदारांनी कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अनिल विज, कृष्ण लाल पंवार, विपुल गोयल, राव नरवीर सिंह, महिपाल ढांडा, श्रुति चौधरी, अरविंद शर्मा, श्याम सिंह राणा, रणबीर गंगवा, कृष्ण बेदी, गौरव गौतम, आरती राव, राजेश नागर यांना हरयाणाच्या नवीन सरकारमध्ये स्थान मिळल्याचं सांगितलं जात आहे. 

मागील दहा वर्षांपासून हरयाणामध्ये भाजपाची सत्ता आहे. यंदा झालेल्या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने 48 जागा जिंकल्या. तर  37 जागांवर काँग्रेसने बाजी मारली. तसेच 2 जागांवरून  इंडियन नॅशनल लोकदलाचे उमेदवार विजयी झाले आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story