सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड 10 नोव्हेंबरला होणार निवृत्त ; पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची शिफारस

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड हे येत्या 10 नोव्हेंबरला निवृत्त होणार आहे. निवृत्तीआधी त्यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस केल्याची माहिती मिळत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Thu, 17 Oct 2024
  • 01:18 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड हे येत्या 10 नोव्हेंबरला निवृत्त होणार आहे. निवृत्तीआधी त्यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस केल्याची माहिती मिळत आहे. 

सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड हे येत्या 10 नोव्हेंबरला निवृत्त होतील. 8 नोव्हेंबर हा त्यांच्या कामकाजाचा शेवटचा दिवस असणार आहे. गेली दोन वर्षे ते सरन्यायाधीश पदावर कार्यरत आहेत. 10 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांनी पदभार स्विकारला होता.

दरम्यान,  सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी निवृत्तीआधी आपल्या उत्तराधिकाऱ्याची शिफारस केली आहे. अशा स्वरूपाची शिफारस पाठवण्यासंदर्भात केंद्र  सरकारने त्यांना पत्र लिहिले होते. त्यानुसार चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस केली आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story