...म्हणून भाऊ-बहिणीने एकमेकांशी केले लग्न

महाराष्ट्रामधील सरकारी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पैशांवरून आरोप-प्रत्यारोप होत असतानाच भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये अशाच एका योजनेसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथील हाथरसमध्ये भावा-बहिणीने एकमेकांशी लग्न केले आहे.

Maharashtra,Money,Shocking ,Uttar Pradesh,Bharatiya Janata Party

भेटवस्तूंसाठी आणि पैशांसाठी बनाव केल्याचे उत्तर प्रदेशात आले समोर, शेजाऱ्यांनी केली या प्रकरणाची तक्रार

लखनौ : महाराष्ट्रामधील सरकारी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पैशांवरून आरोप-प्रत्यारोप होत असतानाच भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये अशाच एका योजनेसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथील हाथरसमध्ये भावा-बहिणीने एकमेकांशी लग्न केले आहे.

सामूहिक विवाहसोहळ्यामध्ये लग्न करणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील नववधू-वरांना सरकारकडून भेटवस्तू दिल्या जातात. याच भेटवस्तूंसाठी आणि पैशांसाठी चक्क भावा-बहिणीने लग्न केल्याचे समोर आले आहे.

भावा-बहिणीनेच एकमेकांशी लग्न करून सरकारी योजनेचा लाभ मिळवल्याचे शेजाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी तक्रार केली. त्यानंतर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. सदर प्रकरणात चौकशी करण्याचे निर्देश उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेअंतर्गत उत्तर प्रदेश सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सवलती मिळवण्यासाठी हे लग्न लावण्यात आले. या प्रकरणामध्ये सदर भाऊ-बहिणीविरुद्ध एकमेकांशी लग्न केल्याच्या गुन्ह्यासहीत, फसवणूक, सरकारची दिशाभूल करणे यासारख्या प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेअंतर्गत, नवविवाहित वधूच्या खात्यावर ३५ हजार रुपये जमा करण्याबरोबरच संसारासाठी लागणाऱ्या १० हजारांच्या वस्तू दिल्या जातात. तसेच विवाहाची नोंदणी आणि इतर खर्च म्हणून ६ हजार रुपयांचा खर्चही सरकारच करते.

दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, सिकंदरराव येथील एका जोडप्याने या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पैशांसाठी स्वत:ला आधी अविवाहित दाखवून नंतर एकमेकांशीच या योजनेच्या माध्यमातून लग्न करून आर्थिक लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. स्थानिक महापालिकेतील अधिकाऱ्यांनी लग्नाची खोटी प्रमाणपत्रे  बनवून देण्यासाठी मदत केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

उपविभागीय दंडाधिकारी वेद सिंह चौहान यांनी या प्रकरणामध्ये दोषींविरुद्ध कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. ज्या सामूहिक विवाहसोहळ्यात हा गोंधळ झाला तो कार्यक्रम १५ डिसेंबर २०२३ रोजी पार पडला होता. या सोहळ्यात २१७ जोडपी विवाहबंधनात अडकली होती. वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest