चेन्नईतील एअर शोमध्ये चेंगराचेंगरी

भारतीय हवाई दलाच्या ९२ व्या वर्धापन दिनानिमित्त चेन्नईमध्ये एका एअर शोचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या शो दरम्यान उष्माघातामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच तब्बल २३० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चेन्नईमध्ये एका एअर शोचे आयोजन करण्यात आले होते

नेत्रदीपक सोहळ्यासाठी लाखोंची गर्दी; उष्माघाताने ५ दगावले, २३० जणांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल

#चेन्नई

feedback@civicmirror.in

भारतीय हवाई दलाच्या ९२ व्या वर्धापन दिनानिमित्त चेन्नईमध्ये एका एअर शोचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या शो दरम्यान उष्माघातामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच तब्बल २३० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत श्रीनिवासन (४८,रा. पेरुंगलाथूर), कार्तिकेयन (३४), तिरुवोट्टीयुर आणि जॉन (५६) रा. कोरुकुपेट अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे असल्याची माहिती समोर आली असून उपस्थित नागरिकांना चेंगराचेंगरीचाही त्रास सहन करावा लागल्याचे समोर आले आहे.

भारतीय वायुसेनेच्या विशेष गरुड दलाच्या कमांडोंनी बंधकांची सुटका करण्यासाठी मॉक ऑपरेशनचे धाडसी कौशल्य दाखवून प्रात्यक्षिकाला सुरुवात केली. लाइट हाऊस आणि चेन्नई बंदर दरम्यान मरीना येथे आयोजित ९२ व्या एयर फोर्स दिना निमित्त हवाई दलप्रमुख अमरप्रीत सिंह, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन, राज्याचे विविध मंत्री, चेन्नईच्या महापौर आर. प्रिया आणि इतर अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाच्या या एअर शोचा लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश करण्यात येणार होता. हा शो पाहण्यासाठी या ठिकाणी तब्बल १६ लाख लोकांची गर्दी जमली होती. हा शो सकाळी ११ वाजता सुरू झाला होता. त्यानंतर दोन तास हा शो सुरू होता. मात्र, हा कार्यक्रम पाहण्यासाठी सकाळी ८ वाजल्यापासूनच लोक चेन्नईमधील मरीना बीचवर जमले होते.

...म्हणून लोकांना पाणी मिळाले नाही

यावेळी एवढ्या मोठ्या लोकांचं नियोजन योग्य पद्धतीने झाले नाही आणि लाखो लोक गर्दीत अडकले. शहरातील विविध भागात गर्दीमुळे तास लाखो फसले होते. एवढ्या मोठ्या संख्येने लोक एकत्र आल्यामुळे आणि गर्दीत पाणी न मिळाल्यामुळे लोकांना त्रास व्हायला लागला आणि काहींची प्रकृती बिघडली. गर्दीमुळे त्या ठिकाणी असणाऱ्या पाणी विक्रेत्यांना हटवण्यात आले होते. गर्दीमुळे आजूबाजूच्या पाणी विक्रेत्यांना परिसरातून हटवण्यात आले होते. तिच मोठी चूक ठरली.

कारण तिथे उपस्थित असलेल्या लाखो नागरिकांना त्यामुळे पाणी मिळाले नाही. कार्यक्रम संपताच लाखो नागरिक बीचपासून बाहेर पडू लागले. यावेळी पूर्ण रस्ता ब्लॉक झाला. प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाल्यामुळे शेकडो वाहने अडकून पडली. तळपते ऊन आणि गर्दी यामुळे नागरिक रस्त्याच्या कडेलाच बसले. दरम्यान, हा कार्यक्रम संपल्यानंतर घरी परतत असताना लाखो नागरिक एकत्र बाहेर पडल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.  वृत्तसंंस्था

नियोजनाचा अभाव

तामिळनाडूचे विरोधी पक्षनेते आणि एआयडीएमकेचे प्रमुख ई. के. पलानीस्वामी यांनी या घटनेवरून डीएमके सरकारवर टीका केली आहे. या  कार्यक्रमासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली नव्हती. संरक्षण विभागाच्या माहितीनुसार या कार्यक्रमात १५ लाखांहून अधिक लोक उपस्थित होते. एवढे लोक येणार याचा अंदाज असताना राज्य सरकारने कसलीही पूर्वतयारी केली नाही. लोकांना हा कार्यक्रम पाहण्यासाठी किमान तीन तास कडक उन्हात उभे राहावे लागले, असेही त्यांनी म्हटले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story