मुलींना मासिक पाळी दरम्यान मिळणार सुट्टी

मासिक पाळीदरम्यान (Menstrual cycle) तरुणींमध्ये शारीरिक आणि मानसिक थकवा येतो, अनेकांना त्रास होतो. मासिक पाळीदरम्यान आरामाची गरज असते. मासिक पाळीवेळी मुलींना आराम मिळावा यासाठी पंजाब राज्यातील विद्यापीठाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Amol Warankar
  • Sun, 14 Apr 2024
  • 06:11 pm
Menstrual leave

मुलींना मासिक पाळी दरम्यान मिळणार सुट्टी

पंजाब विद्यापीठाने केली घोषणा, एका महिन्यात एक दिवसाच्या रजेसाठी अर्ज करण्याची मुभा, अन्य राज्यांतही लागू होण्याची शक्यता

चंदीगड : मासिक पाळीदरम्यान (Menstrual cycle) तरुणींमध्ये शारीरिक आणि मानसिक थकवा येतो, अनेकांना त्रास होतो. मासिक पाळीदरम्यान आरामाची गरज असते. मासिक पाळीवेळी मुलींना आराम मिळावा यासाठी पंजाब राज्यातील विद्यापीठाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मासिक पाळी रजा  (Menstrual leave) देण्याचा निर्णय पंजाब विद्यापीठाने घेतला आहे. शैक्षणिक सत्र २०२४-२०२५ साठी विद्यापीठाने हा नवा नियम लागू केला आहे.

पंजाबमध्ये पहिल्यांदाच विद्यापीठाने मासिक पाळीच्या रजेचा मोठा पुढाकार घेतला आहे. याबाबतची माहिती देणारे परिपत्रक विद्यापीठाने जारी केले असले तरी विद्यापीठ प्रशासनाने त्यासाठी काही अटीही घातल्या आहेत. पंजाब युनिव्हर्सिटी, चंदीगडच्या कुलगुरूंनी सांगितले आहे की, आगामी शैक्षणिक सत्र २०२४-२०२५ पासून विद्यार्थिनींना अटी व शर्तींसह रजा दिली जाईल, परंतु ही रजा फक्त एक दिवसासाठी दिली जाईल. 

रजा घेण्यासाठी विद्यार्थिनींना प्रथम विभागीय कार्यालयात उपलब्ध फॉर्म भरावा लागेल. फॉर्म सबमिट करण्यासाठी विद्यार्थिनींना रजेची परवानगी मिळेल. म्हणजेच, कॅलेंडरनुसार, एक विद्यार्थिनी मासिक पाळीमुळे एका महिन्यात एक दिवसाच्या रजेसाठी अर्ज करू शकते. विद्यार्थिनीला ती किमान १५ दिवस अभ्यासासाठी आली असेल या अटीवर सुट्टी दिली जाईल. नियमानुसार प्रत्येक सेमिस्टरला चार दिवस सुट्टी दिली जाईल.

फक्त एक दिवस सुट्टी

मासिक पाळीसाठी रजा फक्त सामान्य दिवसात दिली जाईल. मुलींना परीक्षेदरम्यान या रजेसाठी अर्ज करता येणार नाही. रजेची परवानगी अध्यक्ष/संचालकांकडून दिली जाईल. विद्यार्थिनींना  स्व-प्रमाणपत्राच्या आधारे रजा दिली जाईल. विद्यार्थिनीला पाच कामकाजाच्या दिवसांच्या आत अनुपस्थितीच्या रजेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. यानंतर विद्यार्थिनीची हजेरी आणि सुट्ट्या तपासल्या जातील. रजा ठराविक महिन्यातील फक्त एका दिवसासाठी दिली जाईल, रजा कोणत्याही कारणास्तव वाढवता येणार नाही.

दरम्यान याआधी केरळच्या कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विद्यापीठात पहिल्यांदा मासिक पाळीसाठी विद्यार्थिनींना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. असा निर्णय घेणारे हे देशातील पहिले विद्यापीठ होते. जिथे जानेवारी २०२३ मध्ये मासिक पाळीत सुट्टी सुरू केली होती. आसाममधील गुवाहाटी युनिव्हर्सिटी, नालसार युनिव्हर्सिटी ऑफ लॉ हैदराबाद आणि तेजपूर युनिव्हर्सिटी ऑफ आसाम यांनी अशी रजा दिली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story