संग्रहित छायाचित्र
अर्थमंत्री आणि त्यांचे सहकारी अभिनंदनास पात्र आहेत. हा अर्थसंकल्प समाजातील प्रत्येक घटकाला शक्ती देणारा आहे. हा देशातील ग्रामीण भागातील गरिबांना समृद्धीच्या वाटेवर नेणारा अर्थसंकल्प आहे. मागच्या दहा वर्षात २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर निघाले. या माध्यमातून जो नव मध्यम वर्ग तयार झाला. त्यांना या अर्थसंकल्पातून सशक्तीकरण करण्यात आले आहे. युवकांना असंख्य नव्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शिक्षण आणि कौशल्य विकासाला या अर्थसंकल्पातून एक नवी गती मिळेल. मध्यमवर्गाला शक्ती देणारा अर्थसंकल्प आहे. दलित आणि वंचितांना सशक्त करणाऱ्या नव्या योजनांवर हा अर्थसंकल्प समोर आला आहे.
हा तर काँग्रेसचा जाहीरनामा- पी. चिदंबरम
मला हे जाणून आनंद झाला की माननीय अर्थमंत्र्यांनी काँग्रेसचा जाहीरनामा वाचला आहे. त्यांनी रोजगाराशी संबंधित प्रोत्साहन योजना स्वीकारली. काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या पृष्ठ क्रमांक ३० वर त्याचे वर्णन आहे. पृष्ठ क्रमांक ११ वर प्रत्येक शिकाऊ उमेदवाराला भत्त्यासह शिकाऊ योजना सुरू केल्याचा मला आनंद आहे. अर्थमंत्र्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील इतर काही कल्पनाही कॉपी केल्या असत्या, तर मला अजून आवडले असते.
बेरोजगारीची जाणीव- जयराम रमेश
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनीही मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, दहा वर्षांच्या नकारानंतर – जिथे नॉन-बायोलॉजिकल पीएम किंवा त्यांच्या पक्षाच्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात नोकऱ्यांचाही उल्लेख नव्हता. बेरोजगारी हे एक राष्ट्रीय संकट आहे ज्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, असे स्पष्टपणे कबूल केले असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
महाराष्ट्राला ठेंगा- विजय वडेट्टीवार
देशात सगळ्यात जास्त कर देणाऱ्या राज्याला सावत्र वागणूक का? केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राला नेहमी दुय्यम वागणूक देते हे आज पुन्हा सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणार आणि बजेटमध्येदेखील महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करत भाजपकडून महाराष्ट्राचा स्वाभिमान सतत तुडवला जात आहे, हे कधीपर्यंत सहन करायचे? टॅक्स आणि मत लुटण्यासाठी महाराष्ट्र आणि द्यायची वेळ आली तर गुजरात किंवा इतर राज्य.