संग्रहित छायाचित्र
पहिली योजना – प्रथम रोजगारप्राप्त कामगार
एक लाख रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्या कामगारांना ईपीएफओमध्ये पहिल्यांदा नोंदणी झाल्यानंतर तीन हप्त्यांमध्ये १५ हजार रुपयांची मदत मिळेल.
दुसरी योजना – उत्पादन क्षेत्रात रोजगार निर्मिती
उत्पादन क्षेत्राशी निगडित पहिल्यांदाच रोजगारप्राप्त कामगारांना ईपीएफओ जमा झाल्यानंतर पहिल्या चार वर्षांत इन्सेटिव्ह दिला जाईल. याचा ३० लाखांहून अधिक युवकांना फायदा होईल.
तिसरी योजना – मालकांना पाठिंबा
या योजनेच्या माध्यमातून सरकार मालकांवरील बोजा कमी करण्यासाठी मदत करेल. या माध्यमातून नव्या कर्मचाऱ्यांना ईपीएफओ योगदानात मालकांना दोन वर्षांपर्यंत प्रत्येक महिन्यासाठी तीन हजार रुपयांचा मोबदला दिला जाईल.
चौथी योजना – महिलांना रोजगारात सामील करून घेणे
रोजगार आणि नोकऱ्यांमध्ये महिलावर्गाचा सहभाग अधिकाधिक वाढविण्यासाठी महिलांसाठी वसतिगृह, क्रॅश कोर्स आणि इतर कौशल्य विकास कार्यक्रम सुरू केले जातील.
पाचवी योजना – कौशल्य विकास
पाच वर्षांत २० लाख युवकांचा कौशल्य विकास करण्यात येईल. १००० आद्योगिक प्रशिक्षण केंद्रांना अद्ययावत करण्यात येईल. प्रत्येक वर्षी २५ हजार युवकांना कौशल्य विकासासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. ५०० मोठ्या कंपन्यात १ कोटी युवकांना इंटर्नशिप मिळवून दिली जाईल. या दरम्यान दरमहा ५ हजार रुपयांचा भत्ता दिला जाईल.