संग्रहित छायाचित्र
मुद्रा योजनेच्या मर्यादेत वाढ केली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना आता अधिक किमतीचे कर्ज मिळणार आहे. निर्मला सीतारामन यांनी मुद्रा योजनेची मर्यादा १० लाख रुपयांनी वाढवून २० लाखांपर्यंत करण्यात येणार आहे.
पंतप्रधान मुद्रा योजना ही सरकारने २०१५ साली सुरू केली होती. सर्वसामान्यांना एखादा रोजगार करायचा असेल त्यासाठी कर्जाची आवश्यकता असल्यास सरकारच्या या योजनेतून तुम्हाला १० लाखांपर्यंतचे कर्ज मिळत होते. मात्र, २०२४ च्या अर्थसंकल्पात आता कर्जाची मर्यादा वाढवण्यात आली आहे. आता मुद्रा योजनेंतर्गंत २० लाखांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. बँकेतून किंवा पतपेढीतून कर्ज घ्यायचे झाले तर सोनं किंवा घर तारण ठेवावे लागत होते.
मात्र, मुद्रा योजनेंतर्गत विना गँरटी कर्ज मिळते. त्याचसोबत कर्जासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही. कर्ज परतफेडीचा कालावधी पाच वर्षांपर्यंत वाढवलादेखील जाऊ शकतो. मुद्रा योजनेंतर्गत तीन श्रेणींमध्ये कर्ज दिले जाते. पहिल्या श्रेणीत शिशु कर्ज या अंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. किशोर लोन या प्रकारात ५० हजार ते ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. तर, तिसऱ्या टप्प्यात ५ ते १० लाखापर्यंतचे कर्ज दिले जाते.