Nasruddin Shah : 'तुम्ही माझं डोकं फिरवलंय

बॉलिवूडच्या कलाकारांबद्दल सामान्य प्रेक्षकांना मोठी उत्सुकता असते, हे कलाकार विविध माध्यमातून, अनेक गोष्टींमुळे सातत्याने चर्चेत असतात. मात्र हे कलाकार अचानक समोर आले तर त्यांच्यासोबत एक फोटो काढण्यासाठी चाहते अनेक प्रयत्न करताना दिसतात.

Nasruddin Shah

'तुम्ही माझं डोकं फिरवलंय

बॉलिवूडच्या कलाकारांबद्दल सामान्य प्रेक्षकांना मोठी उत्सुकता असते, हे कलाकार विविध माध्यमातून, अनेक गोष्टींमुळे सातत्याने चर्चेत असतात. मात्र हे कलाकार अचानक समोर आले तर त्यांच्यासोबत एक फोटो काढण्यासाठी चाहते अनेक प्रयत्न करताना दिसतात. आता बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते नसरुद्धीन शहा यांचा एक व्हीडीओ समोर आला आहे ज्यामध्ये ते चाहत्यांवर ओरडताना दिसले आहेत. (Nasruddin Shah) 

नुकतेच अभिनेता दिल्ली विमानतळावर दिसले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर मास्क होता आणि हातात पुस्तक होते. त्यानंतर चाहते त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी गोंधळ करत होते. मात्र नसीरुद्दीन शाह संतापले आणि त्यांनी त्यांच्यावर आरडाओरडा सुरू केला. 'तुम्ही लोकांनी माझी मन:शांती बिघडवली आहे. डोकं फिरवलं आहे, कुठेही जाऊ दे तुम्ही मला एकटे सोडत नाही' अशा आशयाचे वाक्ये ते बोलत असलेले या व्हीडीओमध्ये पाहायला मिळत आहे. त्यांचा हा व्हीडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. आता नेटकरी या व्हीडीओवर अनेक कमेंट करताना दिसत आहेत. एका यूजरने म्हटले आहे, वयाचा परिणाम आहे. दुसरा एक यूजर म्हणतो- अशा कलाकारांना महत्त्व  देणे कमी केले पाहिजे. आणखी एका यूजरने म्हटले आहे- काही अभिनेते अभिनयासाठी ओळखले जातात. दरम्यान, नसरुद्दीन शहा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे मोठ्या चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी मी हिंदी चित्रपट पाहणे सोडल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे ते चर्चेत होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story