संग्रहित छायाचित्र
सलमान खानचा शो 'बिग बॉस १८' प्रेक्षकांमध्ये सतत चर्चेचा विषय आहे. मात्र, शोच्या टीआरपीमध्ये ती विशेष झेप यावेळी पाहायला मिळत नाही. हे पाहता शोच्या निर्मात्यांनी टीआरपी वाढवण्यासाठी अनेक मोठी पावले उचलली आहेत. शोशी संबंधित सूत्रांचे मानायचे झाले तर, सलमान खानचे कुटुंबही ‘बीबी-१८’मध्ये दिसणार आहे. सलमान शुक्रवारी (दि. २७) आपला वाढदिवस शोच्या सेटवर कुटुंबियांसोबत साजरा करणार आहे.
२७ डिसेंबरला सलमानचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने शोच्या ‘वीकेंड का वार’ भागात त्याचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. पण यावेळी वाढदिवसाचं सेलिब्रेशन आणखी खास बनवण्यासाठी शोच्या निर्मात्यांनी सलमान खानच्या कुटुंबातील अनेक सदस्यांना सेलिब्रेशनचा भाग बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
या खास प्रसंगी शोमध्ये सलमानची बहीण अर्पिता खान शर्माची मुले, अरबाज खानची मुले आणि सोहेल खानचा मुलगा दिसणार आहे. या सर्वांशिवाय सलमानचा धाकटा भाऊ सोहेलदेखील शोमध्ये दिसणार आहे. सल्लूचा वाढदिवस आणखी मजेशीर करण्यासाठी तो भावासोबत मजा करेल. हे सेलिब्रेशन सलमानच्या चाहत्यांसाठी एक सरप्राईज असणार आहे. हा भाग २६ डिसेंबर रोजी शूट केला जाईल आणि शनिवारी ‘वीकेंड का वार’वर प्रसारित केला जाईल.
'बिग बॉस १८' या शोला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. गेल्या ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये एडन रोज आणि यामिनी मल्होत्रा शोमधून बाहेर पडल्या होत्या. तसेच, दिव्यज्योतसिंग राठीदेखील आठवड्याच्या बेदखल ट्विस्टमुळे बाहेर पडले. शोचा ग्रँड फिनाले भाग पुढील वर्षी १९ जानेवारी रोजी होणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.