संग्रहित छायाचित्र
सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे सोमवारी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. गेले काही दिवस बेनेगल यांच्यावर मुंबईतील वोक्हार्ट रुग्णालयात उपचार सुरू होते. बेनेगल यांच्या पश्चात पत्नी निरा आणि मुलगी पिया असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने चित्रपट क्षेत्रात पोकळी नरमण झाली आहे.
श्याम बेनेगल हे मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. बईतील वोक्हार्ट रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी बेनेगल यांनी स्वत: आपल्या आजारपणाबाबत माहिती दिली होती. त्यांना नियमितपणे डायलिसिस करून घ्यावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले होते. गेल्या काही दिवसांत त्यांचा आजार बळावला होता. दरम्यान, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सोमवारी संध्याकाळी ६.३८ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची पत्नी प्रिया बेनेगल यांनी यासंदर्भात माहिती दिली.
श्याम बेनेगल यांनी अंकूर, निशांत, मंडी, मंथन या चित्रपटांच्या माध्यमातून गंभीर विषय हाताळले. तर वेलकम टू सज्जनपूर, वेल डन अब्बा असे हलकेफुलके चित्रपट देखील त्यांनी बनवले. तसेच ‘भारत एक खोज’, ‘संविधान’ यांसारख्या माहितीपर मालिका देखील त्यांनी दिग्दर्शित केल्या होत्या. गेल्यावर्षीच बांगलादेशचे राष्ट्रपुरूष शेख मुजिबुर रहेमान यांचा जीवनपट ‘मुजिब : द मेकिंग ऑफ ए नेशन’ याचे दिग्दर्शन बेनेगल यांनी केले होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.