Mallika Sherawat : मल्लिकाही ईडीच्या फेऱ्यात

मॅजिक विन जुगार ॲपशी संबंधित प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मल्लिका शेरावत आणि टीव्ही अभिनेत्री पूजा बॅनर्जी यांची चौकशी केली. ‘मॅजिक विन’चे मालक पाकिस्तानी नागरिक आहेत. दुबईतील काही भारतीय नागरिक ते चालवत होते.

संग्रहित छायाचित्र

मॅजिक विन जुगार ॲपशी संबंधित प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मल्लिका शेरावत आणि टीव्ही अभिनेत्री पूजा बॅनर्जी यांची चौकशी केली.  ‘मॅजिक विन’चे मालक पाकिस्तानी नागरिक आहेत. दुबईतील काही भारतीय नागरिक ते चालवत होते. इतकेच नाही तर या वेबसाईटवर पुरुषांच्या टी-२० विश्वचषकाचे बेकायदेशीरपणे प्रसारण करण्यात आले. तसेच ऑनलाइन सट्टेबाजीही केली जात होती.

मिळालेल्या माहितीनुसार, मल्लिकाने ईमेलद्वारे ईडीला आपले उत्तर पाठवले होते, तर पूजा बॅनर्जी चौकशीसाठी ईडीच्या अहमदाबाद कार्यालयात पोहोचली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने दोन मोठ्या सेलिब्रिटींना समन्स पाठवले आहेत. याशिवाय ईडी पुढील आठवड्यात आणखी सात बड्या सेलिब्रिटी, टीव्ही कलाकार आणि विनोदी कलाकारांना समन्स पाठवू शकते. या प्रकरणी गेल्या सहा महिन्यांत ईडीने देशभरात सुमारे ६७ छापे टाकले आहेत.

ईडीने एका निवेदनात म्हटले होते की पोर्टलसाठी आयोजित केलेल्या लॉन्च पार्टीला अनेक बी-टाउन सेलिब्रिटींनी हजेरी लावली आणि 'मॅजिक विन' ला पाठिंबा दिला. त्यांनी त्याच्या जाहिरातीसाठी व्हिडिओ आणि फोटो शूट केले आणि ते त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले.

महादेव बेटिंग ॲप: एका आलिशान लग्नात सहभागी झाल्याने अडचणीत आले रणबीर कपूर, कपिल शर्मा गेल्या वर्षी फेब्रुवारीची गोष्ट आहे. संयुक्त अरब अमिरातमधील ‘रास अल खैमाह’ या चकचकीत शहरात एक आलिशान विवाहसोहळा पार पडला. त्याच्या पाहुण्यांसाठी चार्टर्ड विमानांची व्यवस्था करण्यात आली होती. सनी लिओन, नेहा कक्कर, आतिफ अस्लम, टायगर श्रॉफ यांसारख्या डझनभर सेलिब्रिटींना पार्टीत सहभागी होण्यासाठी आणि परफॉर्म करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

लग्नासाठी योगेश बापट यांची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आर-वन इव्हेंट्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी भाड्याने घेतली होती. या भव्य लग्नासाठी जवळपास २०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आणि संपूर्ण पैसे हवाला किंवा रोख स्वरूपात देण्यात आले. छत्तीसगडमधील भिलाई येथे राहणाऱ्या २८ वर्षीय सौरभ चंद्राकरचे हे लग्न होते.

या लग्नानंतर सौरभ आणि त्याचे महादेव बेटिंग ॲप तपास यंत्रणांच्या रडारवर आले. या प्रकरणी ईडीने रणबीर कपूर आणि कपिल शर्मासारख्या सेलिब्रिटींना समन्स पाठवले आहे. महादेव बेटिंगच्या मनी लाँड्रिंग घोटाळ्यात डझनभर बॉलिवूड सेलिब्रिटी अडकले होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story