Fateh Trailer Out: सोनू सूदच्या 'फतेह' चित्रपटाचा ट्रेलर लाँच;Video

अभिनेता सोनू सूदच्या आगामी 'फतेह' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटातून अभिनेता दिग्दर्शनाच्या जगातही प्रवेश करत आहे. सोनू सूदसोबत या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस, नसीरुद्दीन शाह, शिव ज्योती राजपूत आणि विजय राजसारखे स्टार्स दिसणार आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 25 Dec 2024
  • 06:03 pm
Sonu Sood, Fateh , Jacqueline Fernandez, Naseeruddin Shah, Shiv Jyoti Rajput

अभिनेता सोनू सूदच्या आगामी 'फतेह' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटातून अभिनेता दिग्दर्शनाच्या जगातही प्रवेश करत आहे. सोनू सूदसोबत या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस, नसीरुद्दीन शाह, शिव ज्योती राजपूत आणि विजय राजसारखे स्टार्स दिसणार आहेत.

 

ट्रेलरची सुरुवात नसीरुद्दीन शाहच्या दमदार आवाजाने होते. तो म्हणतो, ‘‘तू आणि मी अशा एजन्सीचा भाग होतो, जिथून आधी एक फोटो रिलीज झाला होता. आणि, नंतर कॉल. कोणाला आणि का मारायचे हे कधीच विचारले नाही? बरोबर की चूक, फक्त मारायचे होते.’’

सलमानच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन यंदा ‘बीबी-१८’च्या सेटवर  होणार 

 

त्यानंतर सोनू सूद विस्फोटक ॲक्शन मोडमध्ये प्रवेश करतो. जॅकलिन म्हणते, ‘‘फतेह, एक गोष्ट आहे, चांगल्या लोकांसोबत वाईट गोष्टी तर घडत नाही ना?’’ याच्या उत्तरात सोनू म्हणतो, ‘‘तुम्हाला माहित आहे की, वाईट काळात देव त्याच्या सेवकांना एकटे सोडत नाही.’’ त्यानंतर नसीरुद्दीन शाह म्हणतात, ‘‘चांगले किंवा वाईट असे काही नसते. फक्त अशुभ लोक असतात.’’ २.५८ मिनिटांच्या या ट्रेलरची खास टॅग लाईन आहे ‘चांगल्या माणसांसोबत वाईट गोष्टी घडत नाहीत.’

 

हा चित्रपट डिजिटल सुरक्षा आणि ऑनलाइन फसवणूक या विषयावर आधारित आहे. हा चित्रपट एका माजी स्पेशल ऑपरेशन्स ऑपरेटरबद्दल आहे, जो सायबर क्राइम सिंडिकेटच्या खोलात उतरतो. ‘फतेह’ हा एक हृदय पिळवटून टाकणारा चित्रपट आहे. जो डिजिटल युगातील गडद रहस्ये उघड करतो. या चित्रपटाचे ॲक्शन सीक्वेन्स हॉलिवूडच्या तंत्रज्ञांनी तयार केले आहेत.

 

सोशल मीडियावर या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून काही लोक सोनू सूदचे अभिनंदन करत आहेत, तर काहींनी चित्रपटाची वाट पाहणार असल्याचे लिहिले आहे. या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओ आणि सोनाली सूद यांनी 'शक्ती सागर प्रॉडक्शन'च्या बॅनरखाली केली आहे. हा चित्रपट पुढील वर्षी १० जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story