संग्रहित छायाचित्र
मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक बाॅलिवूड स्टार्स त्यांच्या मुलांना सपोर्ट करण्यासाठी आले होते. यादरम्यान, सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. त्यामध्ये शाहिद कपूर हा करिना कपूरच्या मागे बसलेला दिसत आहे. हे पाहून चाहत्यांना पुन्हा एकदा 'जब वी मेट' चित्रपटातील गीत आणि आदित्यची आठवण झाली.
या कार्यक्रमात करिना तिची मुले तैमूर आणि जेहला चिअर करण्यासाठी आली होती. तिच्या मागे बसलेला शाहिद आपली मुलगी मीराला सपोर्ट करण्यासाठी आला होता. या दोघांच्या व्हायरल झालेल्या या फोटोवर चाहते उत्स्फूर्तपणे कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले, ‘‘हे छायाचित्र खूप छान आहे - बेबो आणि शाहिद एकाच फ्रेममध्ये!’’ दुसऱ्याने लिहिले, ‘‘गीत आणि आदित्य त्यांच्या मुलांना त्यांच्या संबंधित जोडीदारासोबत पाहत आहेत.’’ तिसऱ्या यूजरने लिहिले, ‘‘शाहिदचा चेहरा सर्व काही सांगत आहे.’’
करिनाने २००० मध्ये इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. शाहिदने २००३ मध्ये पदार्पण केले होते. या दोघांनी पहिल्यांदा 'फिदा' (२००४) चित्रपटात एकत्र काम केले होते. दोघेही 'फिदा'च्या सेटवर पहिल्यांदा भेटले होते. हा तो काळ होता जेव्हा करिनाची गणना यशस्वी अभिनेत्रींमध्ये केली जात होती आणि शाहिदने नुकतेच इंडस्ट्रीमध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली होती. यानंतर दोघेही एकमेकांना डेट करू लागले. पण २००७ मध्ये 'जब वी मेट' हा चित्रपट रिलीज झाला तोपर्यंत ते एकमेकांपासून वेगळे झाले. करिना कपूर आणि सैफ अली खान यांचा विवाह १६ ऑक्टोबर २०१२ रोजी झाला होता. तर शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचा विवाह पंजाबी रितीरिवाजानुसार ७ जुलै २०१५ रोजी झाला होता.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.