यामी गौतमच्या 'आर्टिकल ३७०'चा धुमाकूळ
२३ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना आवडली. या चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ झाली आहे. 'आर्टिकल 370' या चित्रपटातील यामी गौतमच्या अभिनयाचे अनेकजण कौतुक करत आहेत. या चित्रपटाचे आतापर्यंतचे एकूण कलेक्शन ५० कोटी रुपये झाले आहे.
यामीच्या 'आर्टिकल 370' या चित्रपटाला केवळ भारतातच नाही तर जगभर पसंती मिळत आहे. 'आर्टिकल 370' या चित्रपटाची निर्मिती अवघ्या २० कोटींच्या बजेटमध्ये झाली आहे. या चित्रपटात यामी गौतमने एका गुप्तचर अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे, तर अरुण गोविल यांनी या चित्रपटात पीएम मोदींची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात प्रियमणी, किरण करमरकर यांच्यासह इतर कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. आदित्य सुहास जांभळे दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती आदित्य धर यांनी केली आहे. १ मार्च रोजी किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' हा चित्रपटदेखील रिलीज झाला. पण 'आर्टिकल 370' या चित्रपटासमोर 'लापता लेडीज' या चित्रपटाची जादू दिसली नाही. या चित्रपटाने ओपनिंग-डेला ८८ लाखांची कमाई केली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.