झक्कास का जबाब नही!
खल्लास अनिल कपूरचा नाईट मॅनेंजर बाहेर आला असून नकारात्मक भूमिकेतील अनिलला पाहण्याची सर्वांना उत्सुकता होती. एखादी नकारात्मक भूमिका बघण्याची चाहत्यांत एवढी ओढ असेल आणि ते आतुरतेने प्रतीक्षा करत असतील ही बाब तशी अपवादात्मक म्हणावी लागेल.
वयाच्या ६६ व्या वर्षी अनिल कपूरचा उत्साह आणि त्याचा ॲपीयरन्स पाहण्यासारखा म्हणावा लागेल. अनिलने चार दशकांच्या आपल्या फिल्मी कारकिर्दीत कोणता रोल केलेला नसेल असं काही झालेले नाही. गेल्या वर्षीच्या जुग जुग जिओ आणि टीकाकारांनी वाखाणलेला थार यातील त्याच्या भूमिकेची नेहमीच कौतुकाने चर्चा होते. नाईट मॅनेंजरमध्ये त्याने आपले नाणे किती खणखणीत आहे ते दाखवून दिले आहे.
एक चाहता म्हणतो की, अनिल कपूरच्या अभिनयाची रेंज किती आहे हे मजनू भाईने दाखवून दिले होते. मात्र नाईट मॅनेंजरमधील त्याचा शेली रुंगटा पाहून आपण खल्लास होऊन जातो. दुसरा चाहता म्हणतो की, वाढते वय नाकारणाऱ्या अनिलने पुन्हा एकदा आपली रेंज दाखवून दिली आहे. त्यातील व्यक्तिरेखेच्या सर्व शेड त्याने अफलातून पडद्यावर उतरविल्या आहेत.
नो डाऊट, अनिल कपूर द बेस्ट! आपण कोणती भूमिका करू शकत नाही या प्रश्नाला उत्तर नसल्याचे अनिल कपूरने दाखवून दिले आहे. अनिल कपूरचा ॲनिल हा पुढील चित्रपट येऊ घातला आहे. तसेच ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोनबरोबरचा फायटरही लवकरच येऊ घातला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.