संग्रहित छायाचित्र
अलीकडील काळात ‘12th फेल’ आणि ‘द साबरमती रिपोर्ट’ यांसारख्या चित्रपटांतून आपला ठसा उमटवणारा अभिनेता विक्रांत मॅसी याने अचानक अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली. ती वाचून विक्रांतच्या चाहत्यांना धक्का बसला आणि निराशा झाली.
विक्रांतने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘‘गेली काही वर्षे खूप छान आहेत. सततच्या पाठिंब्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. पण जसजसा मी पुढे जात आहे तसे माझ्या लक्षात आले आहे की आता स्वतःला संतुलित करण्याची आणि घरी परतण्याची वेळ आली आहे. पती, वडील, मुलगा आणि अभिनेता म्हणूनही. २०२५ मध्ये आपण एकमेकांची शेवटची भेट घेणार आहोत.
चाहत्यांची निराशा झाली विक्रांत मॅसीने अभिनयातून निवृत्ती घेण्याचे कारण अद्याप उघड केलेले नाही, मात्र त्याच्या या घोषणेने त्याच्या चाहत्यांची नक्कीच निराशा झाली आहे. एकाने लिहिले, ‘‘तुम्ही असे का करत आहात? तुमच्यासारखे कलाकार फार कमी आहेत. आम्हाला चांगला सिनेमा हवा आहे.’’ दुसऱ्याने लिहिले, ‘‘अचानक? सगळं ठीक आहे ना?’’
टीव्हीपासून करिअरची सुरुवात झाली विक्रांतने आपल्या अभिनय कारकिर्दीला छोट्या पडद्यापासून सुरुवात केली. त्याने ‘धरम वीर,’ ‘बालिका वधू,’ र्कुबूल है’ यांसारख्या टीव्ही शोमध्ये काम केले. छोट्या पडद्यावर आपली छाप सोडल्यानंतर तो बॉलिवूडकडे वळला. त्याने २०१३ मध्ये लुटेरा चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘दिल धडकने दो,’ ‘छपाक’ यांसारख्या चित्रपटांमध्येही विक्रांत झळकला. या अभिनेत्याने अनेक चित्रपट केले, परंतु ‘12th फेल’ हा त्याच्या करिअरमधील सर्वात मोठा चित्रपट ठरला. या चित्रपटात त्याने आयपीएस अधिकारी मनोजकुमार यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील विक्रांतच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यांना अनेक पुरस्कारांनीही गौरविण्यात आले.
नुकताच विक्रांतचा 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्याचे खूप कौतुक झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही या चित्रपटाचे कौतुक केले. २०२५ मध्ये विक्रांत 'यार जिगरी' आणि 'आँखों की गुस्ताखियां' या दोन्ही दोन्ही चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
विक्रांतचा ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट १५ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. हा चित्रपट गोध्रा घटना आणि त्यानंतरच्या गुजरात दंगलीवर आधारित आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला होता. चित्रपटाचा मुख्य अभिनेता असलेल्या विक्रांत ला धमक्या आल्या होत्या.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.