संग्रहित छायाचित्र
शत्रुघ्न सिन्हा नुकतेच पत्नी पूनम, मुलगी सोनाक्षी आणि जावई झहीर इक्बालसोबत 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले. शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले की, त्यांच्या सासूला ते आवडत नव्हते आणि त्यांनी शत्रुघ्न यांना ‘बिहारी गुंड म्हणत नाकारले होते.
अर्चना पूरण सिंग यांनी पूनम सिन्हा यांना विचारलं होतं की, त्यांनी आधी प्रपोज केलं होतं की शत्रुघ्न? यावर प्रतिक्रिया देताना शत्रुघ्न यांनी सांगितले की, पूनमने त्यांना लग्नासाठी प्रपोज करण्यास सांगितले होते. त्यानंतर पूनमने सांगितले की, शत्रुघ्नचा मोठा भाऊ लग्नाबाबत बोलण्यासाठी त्यांच्या घरी आला होता, पण त्यांच्या आईने हे लग्न मान्य केले नाही आणि थेट सांगितले की, त्यांची मुलगी फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित कोणाशीही लग्न करणार नाही.
दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा यांनी खुलासा केला, 'जेव्हा माझा भाऊ तिच्या (पूनम सिन्हा) घरी गेला तेव्हा माझ्या सासूने सांगितले, तू तुझ्या भावाला पाहिले आहेस का? हा बिहारी रस्त्यावरचा गुंड आहे आणि आमची मुलगी दुधासारखी गोरी आणि मिस इंडिया आहे. जर आपण दोघांना एकत्र उभे करून कलर फोटो काढला तर तो ब्लॅक अँड व्हाइट दिसेल.
शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांची पहिली भेट पाटण्याहून मुंबईला जाणाऱ्या ट्रेनमध्ये झाली होती. दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केले आणि त्यानंतर ९ जुलै १९८० रोजी लग्न केले.