प्रत्येक महिन्यात ‘त्या’वेळी ब्रेकअप

जान्हवी कपूर हे बाॅलिवूडमध्ये सध्या सक्रिया असलेल्या जनरेशनमधील आघाडीचे आहे, काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवीने सांगितले की, सुरुवातीच्या काही वर्षांत प्रत्येक महियाध्ये ती मासिक पाळीदरम्यान ती शिखरबरोबर ब्रेकअप करत असे.

संग्रहित छायाचित्र

जान्हवी कपूर हे बाॅलिवूडमध्ये सध्या सक्रिया असलेल्या जनरेशनमधील आघाडीचे आहे, काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवीने सांगितले की, सुरुवातीच्या काही वर्षांत प्रत्येक महियाध्ये ती मासिक पाळीदरम्यान ती शिखरबरोबर ब्रेकअप करत असे.

जान्हवी अभिनयाबरोबर स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ती शिखर पहाडियाला डेट करतेय. ती त्याच्याबरोबरचे अनेक फोटो शेअर करत असते. ते दोघे कधी डेटवर तर कधी मंदिरात एकत्र दिसतात. मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नातही जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया एकत्र पोहोचले होते. जान्हवी अनेकदा शिखरचे कौतुक करताना दिसते.

काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवीने सांगितले की, ती प्रत्येक महिन्यात मासिक पाळीदरम्यान ती शिखरबरोबर ब्रेकअप करत असे. तिने या मुलाखतीत मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या त्रासाचाही उल्लेख केला. यावेळी जान्हवीने एका मुलाखतीत तिच्या हार्टब्रेकचा अनुभव सांगितला आणि त्यावेळी तिचा बॉयफ्रेंड शिखर पहारियाने तिला कसे सावरले, याबाबतही ती मोकळेपणाने बोलली.

 ती म्हणाली, “आयुष्यात माझा फक्त एकदाच प्रेमभंग झाला होता, पण त्याच व्यक्तीने पुन्हा माझी मनधरणी केली. सुरुवातीच्या काही वर्षांत, मासिक पाळीच्या पहिल्या दोन-तीन दिवसांत मी शिखरबरोबर ब्रेकअप करत असे. सुरुवातीचे काही महिने तो खूप हैराण झाला; पण नंतर तोही समजून गेला. ब्रेकअपनंतर दोन दिवसांनी मी रडत रडत त्याला ‘सॉरी’ म्हणायचे.”

एका मुलाखतीत जान्हवीने सांगितले होते की, पाळी आल्यावर वेळी तिला प्रचंड वेदना होतात. अंग दुखतं आणि कंबरही दुखते. कधी कधी कामात इतकी व्यग्र असते की मासिक पाळीच्या वेदना विसरून जाते. एकदा मासिक पाळीदरम्यान तिच्या नाकातून रक्त आले होते.

जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहाडिया व्यवसायिक असून तो एक प्रोफेशनल पोलो खेळाडू देखील आहे. शिखरने बॉम्बे स्कॉटिश आणि धीरूभाई अंबानी स्कूलमधून शिक्षण घेतले असून, त्यानंतर लंडनच्या रीजेंट युनिव्हर्सिटीमधून ग्लोबल फायनान्शिअल मॅनेजमेंटमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. लंडनमधील वधावन ग्लोबल कॅपिटल येथे शिखरने इन्व्हेस्टमेंट अॅनालिस्ट म्हणून काम केले आहे. २०१८ मध्ये शिखरने एंटरटेनमेंट आणि गेमिंगचा व्यवसाय सुरू केला. शिखर आणि जान्हवी एकाच शाळेत शिकले असून दोघेही बालपणीचे मित्र आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story