‘बच्चन’ गायब

ऐश्वर्या रायच्या दुबई इव्हेंटचा एक व्हीडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तिच्या नावापुढे बच्चन आडनाव लावलेले नाही. हा व्हीडीओ समोर येताच ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन खरंच घटस्फोट घेणार आहेत की काय, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

ऐश्वर्या राय

ऐश्वर्या रायच्या दुबई इव्हेंटचा एक व्हीडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तिच्या नावापुढे बच्चन आडनाव लावलेले नाही. हा व्हीडीओ समोर येताच ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन खरंच घटस्फोट घेणार आहेत की काय, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

ब समोर आलेल्या या व्हिडिओवर चाहते वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत. एका युजरने कमेंट करून लिहिले आहे, ‘‘तिला तिच्या नावासोबत कोणत्याही आडनावाची गरज नाही. ती एकमेव ऐश्वर्या राय आहे.’’ तर दुसऱ्या यूजरने लिहिल, ‘‘बच्चनशिवाय तिची स्वतःची ओळख आहे.’’

 मात्र, ऐश्वर्या तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर ती अजूनही बच्चन हे आडनाव वापरते. आडनाव हटवल्यामुळे घटस्फोटाच्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे एका अहवालात म्हटले आहे. दुबईतील या कार्यक्रमात व्यावसायिक कारणांमुळे अभिनेत्रीचे पहिले नाव वापरले गेले आहे.

ग्लोबल वुमन फोरमच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ऐश्वर्या दुबईत आली होती. येथे तिने महिला सक्षमीकरणासारख्या मुद्द्यांवर भाष्य केले. त्याचबरोबर घटस्फोटाच्या वृत्तावर तिने मौन पाळले. यावेळी अभिनेत्रीच्या लुकचेही कौतुक करण्यात आले.

 ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान, अमिताभ बच्चन यांनी नुकतेच त्यांच्या ब्लॉगवर त्यांचे कौटुंबिक आणि वैयक्तिक मुद्दे शेअर केले. त्यांनी लिहिले होते की, 'मी कुटुंबाबद्दल बोलणे टाळतो, पण काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी या मुद्द्यांचा गैरफायदा घेतात.' अमिताभ यांनी पोस्टमध्ये त्यांचा मुलगा आणि सुनेचा उल्लेख केला नसला तरी त्यांच्या पोस्टला घटस्फोटाच्या मुद्द्याशी जोडले जात आहे.

 वास्तविक, ऐश्वर्याने या पोस्टच्या एक दिवस आधी रात्री उशिरा मुलगी आराध्याच्या १३व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले होते. १६ नोव्हेंबरला आराध्याचा वाढदिवस होता. बच्चन कुटुंबातील कोणीही त्याच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले नव्हते. हे फोटो समोर आल्यानंतर ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी पुन्हा एकदा जोर पकडला आहे. अमिताभ यांचा ब्लॉग काही तासांनीच समोर आला.

जुलैमध्ये अभिषेक बच्चन अनंत-राधिकाच्या लग्नात त्याच्या कुटुंबासह सहभागी झाला होता. अभिषेकचे संपूर्ण कुटुंब रेड कार्पेटवर उपस्थित होते, मात्र त्यावेळी ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या त्याच्यासोबत नव्हती. अभिषेक आल्यानंतर काही वेळातच ऐश्वर्या आपल्या मुलीसोबत रेड कार्पेटवर पोहोचली आणि पापाराझींना पोज दिली. वेगळ्या एंट्रीसोबतच संपूर्ण लग्नात ते एकत्र दिसले नाहीत. यानंतर ऐश्वर्या राय आपल्या मुलीसोबत सुट्टीवर गेली, तेव्हाही अभिषेक तिच्यासोबत उपस्थित नव्हता.

काही दिवसांपूर्वी अनेक रिपोर्ट्समध्ये अभिषेक आणि अभिनेत्री निमरत कौर यांच्यातील लिंकअपच्या बातम्यांचा उल्लेख करण्यात आला होता. यावर अभिनेत्याच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, या सर्व गोष्टी केवळ अफवा आहेत. अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांचा घटस्फोट होत नाहीये. अभिषेक या विषयावर स्पष्टीकरण देत नाही कारण त्याला कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहण्यास सांगितले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story