संग्रहित छायाचित्र
प्रसिद्ध शो 'फॅब्युलस लाइव्ह्स ऑफ बॉलिवूड वाइव्हज'मुळे प्रकाशझोतात आलेली शालिनी पासी ‘बिग बॉस १८’मध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश करणार आहे. या आठवड्यात ती शूट करणार आहे. दिग्विजय राठी आणि कशिश कपूर यांनी सर्वप्रथम सलमान खानच्या या रिॲलिटी शोमध्ये वाईल्ड कार्ड म्हणून प्रवेश केला होता. त्यानंतर एडिन रोज, अदिती मिस्त्री आणि यामिनी मल्होत्रा यांच्यासारख्या एक से बढकर एक हाॅट पर्सनॅलिटी वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून शोमध्ये सामील झाल्या आहेत. त्यामुळे यावेळचा शो म्हणजे ‘हॉटेनेसचा तडके पे तडका’ ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
शालिनीला 'फेब्युलस लाईव्हज ऑफ बॉलिवूड वाइव्हज' या शोमधून बरीच ओळख मिळाली आहे. या शोमुळे तिला प्रेक्षकांमध्ये एक नवीन प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली आहे. आता तिच्या बिग बॉसमधील एन्ट्रीबद्दल प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.
शालिनीची भूमिका गेल्या सीझनच्या ओरीसारखी असू शकते, ज्याने शोमध्ये प्रेक्षकांना खूप आकर्षित केले. शालिनीचे पात्र आणखीनच वेधक असू शकते. शालिनीला रिॲलिटी शो ‘फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलिवूड वाइव्हज’चा अनुभव आहे. तिचा हा अनुभव तिला यावेळी बिग बॉसमध्ये आत्मविश्वासाने आणि रणनीतीने खेळण्यास मदत करेल, असे मानले जात आहे. या शोमध्ये आपला ठसा उमटवण्याचा ती सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे तिने सांगितले.
शालिनीच्या एन्ट्रीनंतर बिग बॉसमध्ये नवे ट्विस्ट आणि ड्रामाचे वातावरण निर्माण होऊ शकते. तिच्या आगमनाने शोमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे, जे प्रेक्षकांना शोशी जोडून ठेवेल. बिग बॉसमधील तिची एन्ट्री तिच्या करिअरमध्ये नवे वळण आणू शकते, असे सूत्रांचे मत आहे. आपला ठसा उमटवण्यासाठी ती या व्यासपीठाचा पुरेपूर फायदा घेईल.
या आठवड्यात करणवीर मेहरा, दिग्विजय राठी, सारा अरफीन खान, शिल्पा शिरोडकर, कशिश कपूर आणि चुम दरंग यांना शोमधून बाहेर काढण्यासाठी नामांकन मिळाले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.