संग्रहित छायाचित्र
अभिनेता गोविंदा नुकताच द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये पोहोचला. येथे त्याने आपला भाचा कृष्णा अभिषेकला मिठी मारली आणि सात वर्षांची लढाई संपवली. या विषयावर बोलताना कृष्णा म्हणाला, ‘‘हा माझ्या आयुष्यातील सर्वांत अविस्मरणीय दिवस आहे. माझा सात वर्षांचा वनवास माझ्या मामांसोबत स्टेज शेअर करून संपला.’’
गोविंदा म्हणाला, कृष्णाच्या एका गोष्टीने तो खूप दुखावला गेला. मात्र, पत्नी सुनीता यांनी भाचा कृष्णाला नेहमीच साथ दिली. नंतर गोविंदाच्या सांगण्यावरून कृष्णाने मामी सुनीताची सर्वांसमोर माफी मागितली.
गोविंदा या शोमध्ये शक्ती कपूर आणि चंकी पांडेसोबत पोहोचला होता. येथे त्यांनी कृष्णासोबतच्या वादावर पहिल्यांदाच चर्चा केली. कृष्णा आणि त्याच्या अभिनयात वापरल्या जाणाऱ्या संवादांचा मला राग येत असल्याचे त्याने सांगितले. मात्र, पत्नी सुनीता यांनी कृष्णाला नेहमीच साथ दिली. याबाबत गोविंदा म्हणाला, ‘‘माझी पत्नी सुनीता म्हणाली होती की संपूर्ण फिल्म इंडस्ट्री हे करते. कृष्णाला काही बोलू नका. तो पैसे कमवत आहे. त्याला त्याचे काम करू द्या.’’
गोविंदा पुढे कृष्णाला सुनीताची माफी मागायला सांगतो, कारण ती संपूर्ण कुटुंबावर खूप प्रेम करते. मामाच्या शब्दाला मान देऊन कृष्णाने लगेच मामीची माफी मागितली. तसेच तो म्हणाला, ‘‘होय, मीदेखील सुनीता मामींवर प्रेम करतो. मला माफ करा.’’
शोच्या दुसऱ्या सेगमेंटमध्ये, जेव्हा कृष्णा अभिषेक लेग ग्राइंडिंग आणि करोडपती बनण्याबद्दल विनोद सांगत होता, तेव्हा गोविंदाने त्याला थांबवले आणि सांगितलें की, ‘‘जेव्हा मला चुकून गोळी लागली तेव्हा कृष्णा रडत होता आणि आता तो लेग पीसबद्दल विनोद करत आहे.’’
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.