वॉर-२ लवकरच !
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची स्पाय फिल्म पठाण अजूनही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. प्रदर्शनास चार आठवडे होऊनही चाहत्यांच्या तिकीट खिडकीवरील रांगा काही कमी होत नाहीत. पठाण लवकरच विक्रमी कमाई करणार असल्याचे बोलले जाते.
या चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्मने केली होती. पठाणच्या यशाची झळाळी ओसरायच्या आतच यशराज नवीन चित्रपट तयार करत असल्याची बातमी पुढे येत आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आता पुढील चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. मीडियातील बातम्यानुसार सिद्धार्थचा पुढील चित्रपट हा वॉरचा पुढील भाग असणार आहे. वॉर-२ ऋतिक रोशन असणार हे नक्की असल्याचे बोलले जात आहे. एवढेच नव्हे तर वॉर-२ सेटवर जात असल्याची लवकरच घोषणा होईल. वॉर-२ हेरगिरीवरच आधारित असणार असला तरी त्याचा कॅनव्हास अधिक मोठा असेल. यात टायगर श्रॉफ असेल की नाही याबाबत नक्की माहिती उपलब्ध होत नाही.
वॉरच्या पहिल्या भागात ऋतिक प्रमुख भूमिकेत होता. त्यामुळे त्याचा दुसऱ्या भागातील समावेश नक्की मानला जातो. एवढेच नव्हे तर वॉर-२ शिवाय सिद्धार्थ आनंद अन्य चित्रपटांच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. दक्षिणेतील चित्रपट निर्माते सिद्धार्थ आनंदच्या संपर्कात असून त्याला मिळालेली ऑफर त्याने स्वीकारल्यास पुढील चित्रपटात ऋतिक रोशन आणि प्रभास एकत्र आल्याचे
पाहावयास मिळेल.
पठाणच्या यशानंतर पठाण-२ ची ही चर्चा आहे. यामुळे वॉर किंवा पठाण पैकी कोणाच्या दुसऱ्या भागाची प्रथम सुरुवात होते ते आता पाहावे लागेल. विशेष म्हणजे सिद्धार्थच्या पुढील चित्रपटाची अजून घोषणा झालेली नाही.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.