गर्दी जमली होती, विकी कौशलची एन्ट्री झाली आणि आवाज आला कसं काय पुणेकर? आणि चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला

नुकतंच विकी कौशल आणि ॲमी विर्क यांनी आपल्या येत्या बॅड न्यूज या सिनेमाच्या प्रोमोशनच्या निमित्ताने हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला तसेच पब्लिकलाही आपल्या डान्सच्या स्टेप्सने वेड लावलं. 

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 10 Jul 2024
  • 05:33 pm

गर्दी जमली होती, विकी कौशलची एन्ट्री झाली आणि आवाज आला कसं काय पुणेकर?

आकांक्षा यादव

नुकतंच विकी कौशल आणि ॲमी विर्क यांनी आपल्या येत्या बॅड न्यूज या सिनेमाच्या प्रोमोशनच्या निमित्ताने हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला तसेच पब्लिकलाही आपल्या डान्सच्या स्टेप्सने वेड लावलं. 

चित्रपटाच्या निमित्ताने सर्व शहरांमध्ये प्रमोशन टूर सुरू  झाली आहे मात्र त्याची  सुरुवात विकी कौशलच्या आवडत्या  पुणे शहरातून झाली. विकी कौशल आणि एमी विर्क यांनी पुणेकरांसोबत चित्रपटाचा प्रमोशन प्रवास साजरा केला. 

चाहत्यांशी आणि पत्रकारांशी दिलखुलास गप्पा मारताना विकी कौशल म्हणाला, “पुण्यात आल्यावर तो नेहमी आनंदी असतो, त्याला पुणेकरांचे खूप प्रेम मिळते, त्यामुळे त्याला पुणे शहराबद्दल विशेष आत्मीयता वाटते आणि प्रमोशनमुळेही आनंद होतो. पुण्यातून सुरुवात झाली.

"आऊट एन आऊट कॉमेडी असलेल्या या चित्रपटात, प्रेक्षकांना परफेक्ट कॉमेडी टायमिंगने हसवणे हे आव्हानात्मक पण काम करणे मजेदार आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत या चित्रपटाचा आनंद घेऊ शकता,” विकी कौशलने पत्रकारांना सांगितले.

विकी कौशलचा चित्रपट आला आणि त्याची कोणतीही चर्चा झाली नाही असं कधीच होत नाही . 'हुस्न तेरा तौबा तौबा...' या गाण्याच्या डान्स स्टेप्सने विकी कौशलच्या चाहत्यांना आणखी वेड लावले आहे. पुणेकरांशी संवाद साधताना विकी कौशलचा उत्साह आणि आनंद जाणवत होता आणि आता 19 जुलैला 'बॅड न्यूज' हा चित्रपट आपल्या सर्वांच्या भेटीला  येणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story