File Photo
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूरचा ‘स्त्री २’ चा हा चित्रपट आजही चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादानंतर श्रद्धा या ना त्या कारणामुळे चर्चेत राहते. आता श्रद्धा चर्चेत येण्याचे कारण तिचे रिलेशनशिप आहे. श्रद्धाने तिचे रिलेशनशिप स्टेटस कन्फर्म केल्यानंतर एकच चर्चा रंगली आहे. श्रद्धा कपूर तिचे खासगी आयुष्य हे लाइमलाइटपासून दूर ठेवते. तिने एका मुलाखतीत तिच्या पार्टनरचा उल्लेख करत चाहत्यांना काही गोष्टींविषयी विचार करण्यास भाग पाडले आहे.
या मुलाखतीत रिलेशनशिपमध्ये असल्याचे श्रद्धाने मान्य केले आहे. तिने म्हटले की, मला माझ्या पार्टनरसोबत वेळ व्यतीत करणे खूप आवडते आणि त्याच्यासोबत चित्रपट पाहणे आवडते, मी डिनरवर जाते आणि फिरत असते. श्रद्धा कपूर ही राहुल मोदीला डेट करत होती. पण नुकत्याच आलेल्या माहितीनंतर त्या दोघांचे ब्रेकअप झाल्याचे म्हटले जाऊ लागले.
या सगळ्या अफवा तेव्हा वाढल्या जेव्हा श्रद्धा कपूरने राहुलसोबत त्याची बहीण आणि प्रोडक्शन हाउसला अनफॉलो केले. श्रद्धा कपूरची चुलत बहीण जनाई भोसलेनेही राहुलला अनफॉलो केले आहे. ज्यामुळे वाटू लागले आहे की त्यांचा खरेच ब्रेकअप झाला. फक्त श्रद्धा नाही तर राहुलनेही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, पण ते त्यांच्या रुमर्ड रिलेशनशिपला घेऊन काही काळ चर्चेत होते.
या वर्षाच्या सुरुवातीला दोघांनी डेटिंगच्या अफवा सुरु झाल्या होत्या. ते दोघे अंबानींच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये एकत्र दिसले होते. तर श्रद्धा कपूरने जून महिन्यात इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत तिच्या रिलेशनशिपला कन्फर्म केले.