एमर्जन्सी’चा मार्ग मोकळा

कंगना रणौतच्या ‘एमर्जन्सी’ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. हा चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. लवकरच कंगना रणौत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करणार आहे.

Emergency,Movie,Bollywood,film ,Kangana Ranaut,Censor Board,release date

File Photo

कंगना रणौतच्या ‘एमर्जन्सी’ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. हा चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. लवकरच कंगना रणौत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करणार आहे.या चित्रपटाबाबत शीख संघटनांनी आक्षेप घेतला होता, त्यामुळे सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र रोखून धरले होते. या प्रकरणावर कंगनाने संतापही व्यक्त केला होता. या चित्रपटातील अनेक दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला होता. बोर्डाने या चित्रपटातील तीन दृश्ये हटवण्याच्या सूचना दिल्या होत्या. चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी त्यात १० बदल करावे, अशा सक्त सूचनाही देण्यात आल्या होत्या.

कंगनाने ‘एमर्जन्सी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. या चित्रपटात तिने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडला होता. शीख समुदायाच्या लोकांनी आरोप केला आहे की, चित्रपटात त्यांच्या समाजातील लोकांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आली आहे. मध्य प्रदेशच्या जबलपूर शीख संघाने जबलपूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढली होती. या चित्रपटावर संपूर्ण बंदी घालण्याची मागणी करणारे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगनाने एका मुलाखतीत पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली बदमाश लोक हिंसाचार पसरवत असल्याचे सांगितले होते. तिथे बलात्कार आणि हत्या होत होत्या. किसान विधेयक मागे घेतले गेले, अन्यथा या बदमाशांचे खूप मोठे नियोजन होते. ते देशात काहीही करू शकतात. यानंतर पंजाबमध्ये कंगनाच्या विरोधात संताप पसरला.

भाजपने मात्र, कंगनाचे हे वक्तव्य पक्षाचे नसून तिचे वैयक्तिक असल्याचे स्पष्ट केले. ‘‘कंगनाच्या विधानाशी पक्ष असहमत आहे. कंगनाने पक्षाच्या धोरणात्मक मुद्द्यांवर बोलू नये. भविष्यात अशी वक्तव्ये करू नयेत,’’ अशा स्पष्ट शब्दांत भाजपने तिला फटकारले होते.  

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story