File Photo
रणबीर कपूरची बहीण रिद्धिमाने खुलासा केला आहे की, ऋषी कपूर यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंब दु:खी झाले, विखुरले होते. त्यांनी एकमेकांसमोर आपले दु:ख दाखवले नाही. ते वेगवेगळ्या खोल्यांमध्ये रडत असत.वर्षानुवर्षे कॅमेऱ्यापासून दूर राहिल्यानंतर रिद्धिमाने अलीकडेच नेटफ्लिक्स शो ‘फॅब्युलस लाइव्ह्स व्हर्सेस बॉलिवूड वाइव्हज’मधून ऑनस्क्रीन पदार्पण केले.
यासंदर्भात सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत रिद्धिमा म्हणाली, ‘‘जेव्हा माझ्या वडिलांचे निधन झाले, तेव्हा आम्ही आमच्या भावना एकमेकांना दाखवल्या नाहीत. आम्ही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये जायचो आणि रडायचो. दीर्घकाळ हे चालले. नंतर आम्ही सर्व सामान्यपणे बोलू लागलो. मात्र, या घटनेने आम्हाला एकमेकांच्या खूप जवळ आणले.’’
रिद्धिमा म्हणाली की, तिच्या कुटुंबीयांनी त्यांचे दु:ख शेअर केले नसले तरी प्रत्येकजण आतून दु:खी होता. यापूर्वी एका मुलाखतीत तिने सांगितले होते की वडिलांच्या निधनानंतर ती आणि तिची आई एकमेकींची पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेतात. ऋषी कपूर रक्ताच्या कर्करोगाने ग्रस्त होते. न्यूयॉर्कमध्ये दीर्घकाळ उपचार सुरू होते. त्यानंतर २०१९ मध्ये ते भारतात परतले. ३० एप्रिल २०२० रोजी त्यांचे निधन झाले.