तमन्ना भाटिया ईडीच्या रडारवर, महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशी

प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया आता ईडीच्या रडारवर आली आहे. तमन्नची ईडीकडून चौकशी झाल्याची माहिती समोर आली आहे. तमन्नाने 'फेअर प्ले' या बेटींग अॅपचे प्रमोशन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Fri, 18 Oct 2024
  • 12:53 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया आता ईडीच्या रडारवर आली आहे. तमन्नची ईडीकडून चौकशी झाल्याची माहिती समोर आली आहे.  तमन्नाने 'फेअर प्ले'  या बेटींग अॅपचे प्रमोशन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे अॅप  महादेव बेटिंग अॅपशी संबंधित आहे. या अॅपच्या माध्यमातून मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील अनेक गेम्सवर सट्टा लावता येतो. 

काही दिवसांपूर्वी तमन्नाला ईडीने समन्स धाडले होते. ईडीच्या गुवाहाटी येथील कार्यालयात तिला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. आई सोबत तमन्ना गुवाहाटीला पोहोचली. गुरुवारी दुपारनंतर ईडीच्या कार्यालयात काही तास तिची कसून चौकशी झाली.  

महादेव बेटिंग अॅप प्रकरणात आतापर्यंत रणबीर कपूर, श्रद्धा कपूर यांना समन्स पाठवण्यात आले आहे. तसेच प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माचीही यासंदर्भात चौकशी झाली आहे. त्यानंतर आता  तमन्ना भाटिया हिची चौकशी झाली आहे. 

तमन्ना भाटियाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. बाहुबली चित्रपटातील तिची भूमिका गाजली. स्त्री 2 चित्रपटातील तिचे गाणे लोकांच्या चांगलेच पसंतीस उतरले. अशातच ईडीच्या चौकशीमुळे तमन्ना भाटियाच्या अडचणींमध्ये मोठी भर पडली आहे. तसेच तमन्नाचे चाहतेदेखील चिंतेत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story