File Photo
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या अंत्यसंस्कारावेळी सर्वजण शाहरुख खानची वाट पाहत होते. बाबा सिद्दिकींचा जवळचा मित्र शाहरुख त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येईल, अशी लोकांना अपेक्षा होती. पण तो आलाच नाही. या कृतीमुळे त्याच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
अलीकडेच शाहरुख त्याची व्यवस्थापक पूजा दलानीच्या घराबाहेर दिसला. त्याची कार पूर्णपणे झाकलेली होती. मात्र त्यात शाहरुख उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचे गार्ड गाडीचे रक्षण करत होते. या घटनेचे फोटो, व्हीडीओ पाहून यूजर्स म्हणाले, ‘‘शाहरुख, तुला आपल्या मित्राच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी होण्यासाठी वेळ मिळाला नाही का?’’ एका यूजरने लिहिले की, ‘‘बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीला मोठ्या अभिमानाने हजेरी लावायचा आणि मृत्यूच्या दिवशी तू कुठे होतास?’’
‘‘तू ना बाबा सिद्दीकींच्या घरी गेला ना त्यांच्या अंत्यविधीला, तुला वेळ मिळाला नाही का,’’ असे सवालही अनेक यूझर्सनी शाहरुखला उद्देशून केला. बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी न झाल्यामुळे अनेक यूजर्सनी शाहरुखला ट्रोल केले आहे.
या प्रकरणावर शाहरुखने ट्विटही केले नाही. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, बाबा सिद्दीकींची शाहरुखसोबतची मैत्री तितकीच खास होती जितकी सलमान खानशी होती. अशा परिस्थितीत त्यांची हत्या झाली तेव्हा सलमानसोबत शाहरुखही त्यांच्या घरी पोहोचेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. सलमानने बाबांच्या घरी जाऊन त्यांचे शेवटचे दर्शन घेतले पण शाहरुख तिथे दिसला नाही किंवा त्याने यासंबंधी काही ट्विटही केले नाही.
१२ ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स गँगने घेतली आहे. या प्रकरणी आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे, तर तिघे जण फरार आहेत.