सोनाली कुलकर्णीच्या पोस्टने वेधले लक्ष!
माय मराठी भाषा, तिचे महत्त्व आणि तिचं कौतुक करत भाषेविषयीची अनेक वैशिष्ट्य यावेळी नेटकऱ्यांना, वाचकांना सांगण्यात आली आहेत. या सगळ्यात आता प्रसिद्ध मराठी आणि हिंदी चित्रपटांमधील अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या पोस्टनं वाचकांचे, चाहत्यांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले आहे. तिने फेसबुकवर काही वेळेपूर्वी मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने खास पोस्टही शेयर केली आहे. त्यात ती म्हणते, मातृभाषा घरी आनंदाने नांदते आहे, चुकतमाकत शिकते आहे.. बहरते आहे.. डिस्टर्ब
न होता लोभ असावा ही विनंती..
यावेळी सोनालीने फेसबुकवर काही फोटोही शेयर केले आहेत. त्यात दारावर मराठी भाषेत लिहिलेला मेसेज आणि तो वाचून नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंट्स भन्नाट आहेत. नेटकऱ्यांनी मराठी दिनाच्या निमित्ताने मराठी भाषा सद्यस्थिती आणि वास्तव यावर आधारित प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने अनेक सेलिब्रेटींनी वेगवेगळ्या पोस्ट करून चाहत्यांना जिंकून घेतले आहे. यात अभिनेता स्वप्नील जोशी, अभिजित केळकर, नटरंग फेम सोनाली कुलकर्णी या सेलिब्रेटींच्या नावाचा समावेश आहे. दुसरीकडे मुंबईमध्ये मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने पार पडलेल्या एका कार्यक्रमामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील त्यांच्या खास शैलीत मराठी भाषा दिन आणि त्याचे महत्त्व समजावून सांगितले आहे. एका ठराविक मराठी चित्रपट अथवा नाटकालाच गर्दी का होते, असा प्रश्न विचारत आता आपल्याला यात बदल करावा लागेल. असेही त्यांनी प्रेक्षकांना, मराठी भाषकांना सुचवले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.